शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
5
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
6
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
7
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
8
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
9
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
10
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
12
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
13
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
14
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
15
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
16
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
17
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
18
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
19
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
20
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे आदेश

By admin | Updated: June 27, 2014 00:16 IST

हिंगोली: जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये ‘लोकमत’च्या विविध ठिकाणच्या प्रतिनिधींनी बुधवारी तलाठ्यांच्या उपस्थिती बाबतचे स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर महसूल विभागामध्ये गुरूवारी खळबळ उडाली.

हिंगोली: जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये ‘लोकमत’च्या विविध ठिकाणच्या प्रतिनिधींनी बुधवारी तलाठ्यांच्या उपस्थिती बाबतचे स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर महसूल विभागामध्ये गुरूवारी खळबळ उडाली. कामचुकार तलाठ्याचे पितळ उघडे पडल्याने जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सकाळीच वॉटस् अ‍ॅपवर पाचही तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना बातमीचे कात्रण पाठवून या बाबत चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
सध्या शैक्षणिक कादगपत्रांसाठी विद्यार्थी तसेच शेती विषयक कामांसाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांची आवश्यकता असताना अनेक तलाठी महिनोमहिने सज्जावर जातच नसल्याचे बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान उघड झाले होते. याबाबतचे वृत्त गुरूवारी प्रसिद्ध होताच अनेक शेतकऱ्यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे फोन करून स्वागत केले. तसेच तलाठ्यांचे पितळ उघडे पाडल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानले.
या वृत्ताने महसूल विभाग खडबडून जागा झाला. जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सकाळीच पाचही तहसीलदार तसेच हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, वसमतच्या उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी यांना या प्रकरणी तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. याबाबत तसे लेखी पत्र देण्यास निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण फुलारी यांना सांगितले. या बाबत ‘लोकमत’शी बोलताना जिल्हाधिकारी पोयाम म्हणाले की, यापुढे प्रत्येक तलाठ्याने त्यांच्या सज्जावर उपस्थित राहण्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल. त्यामध्येही तलाठी दोषी आढळून आले तर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांवर कारवाई केली जाईल. जनतेची गैरसोय बिलकुल खपवून घेतली जाणार नाही, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. या संदर्भात हिंगोली उपविभागीय अधिकारी तडवी यांनी हिंगोली व सेनगावचे तहसीलदार यांना त्यांचे तलाठ्यावर नियंत्रण नसल्याचे दिसून आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
पाच तलाठ्यांना बजावल्या नोटिसा
सज्जावर बुधवारी गैरहजर असलेल्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील तलाठी यू.आर. डाखोरे, शिवणी बु. येथील तलाठी गंगाधर पाखरे, धानोरा (ज.) येथील भारत पडोळे, वाई येथील तलाठी जी.जी. देवकर, बाभळी येथील तलाठी चंद्रकांत धुमाळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती कळमनुरीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी कृष्णकांत चिकुर्ते यांनी सांगितली.
सामुहिक तलाठी सज्जास कुलूप
वसमत येथे १० ते १२ तलाठ्यांनी एकत्र येवून निर्माण केलेल्या सामुहिक तलाठी सज्जास गुरूवारी कुलूप असल्याचे दिसून आले. या कार्यालया बाहेर आसेगाव, सुनेगाव येथील ग्रामस्थ तलाठ्यांची वाट पाहत असताना दिसून आले. बेजबाबदार व शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही यावेळी या शेतकऱ्यांनी सांगितले.