सदस्यता नोंदणीचे काहीच दिवस शिल्लक

By Admin | Updated: September 4, 2014 01:23 IST2014-09-04T00:48:57+5:302014-09-04T01:23:02+5:30

जालना : लोकमत कॅम्पस सदस्यता नोंदणीला मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Only a few days of subscription registration | सदस्यता नोंदणीचे काहीच दिवस शिल्लक

सदस्यता नोंदणीचे काहीच दिवस शिल्लक


जालना : लोकमत कॅम्पस सदस्यता नोंदणीला मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व शाळांतून सदस्यता नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे़ कॅम्पस क्लब हे विदयार्थ्यांच्या कलगुणांना वाव देणारे सर्वांत मोठे व्यासपीठ जालन्यात दरवर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर यावर्षीही सूरू झालेले आहे. कॅम्पस क्लबच्या माध्यमातून चित्रकला, रॅपीड चेस स्पर्धा, ग्रिटिंग कार्ड बनवा स्पर्धा, आर्ट अण्ॅन्ड क्राफट, हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन या वर्षात करण्यात आले आहे.
सदस्यांना दीड हजार रुपयांची विविध बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच १५०००० रू किमतीचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी लोकमत भवन गीता कॉम्पक्स, गादिया हॉस्पीटल समोर भोकरदन नाका, जालना सत्यजित राजपूत ९६६५१०११३४ या क्रमांकावर तसेच शिवानी कलेक्शन, शनि मंदीर (९४२४२७४९१४), श्री साई गिफ्ट सेंटर, मेन रोड चंदनझिरा, (९४२१३१८४५८) जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत टाईम्स कॅम्पस् क्लबतर्फे करण्यात आले़ (प्रतिनिधी)

Web Title: Only a few days of subscription registration