शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सारडांच्या निवडीवरुन ‘आॅनलाईन’ शिवीगाळ

By admin | Updated: May 18, 2015 00:21 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आदित्य सारडा यांची निवड झाल्यानंतर सोशल मिडीयाच्या एका संकेतस्थळावर पोस्ट पडल्या

शिरीष शिंदे , बीडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आदित्य सारडा यांची निवड झाल्यानंतर सोशल मिडीयाच्या एका संकेतस्थळावर पोस्ट पडल्या. मात्र, त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. त्यावरून ठिणगी पडली. सारडा समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हा ‘आॅनलाईन’ वाद उफाळून आला. एवढ्यावरच तो थाांबला नाही तर एकमेकांना चक्क शिवीगाळ केली. हे प्रकरण वाढू नये म्हणून नंतर त्यांनी ती पोस्ट काढून टाकल्या.सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून आदित्य सारडा यांचे नाव समोर आल्यानंतर शहरामध्ये वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरु झाली. संचालक मंडळामध्ये राजकारणाचा वेगवेगळ्या पदांचा अनुभव असणाऱ्या लोकांचा समावेश होता मात्र त्यांची निवड न करता सहकार किंवा इतर कोणताही अनुभव नसताना त्यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांचे २४ वर्ष आहे. ‘पोरा-सोरांच्या हातात पालकमंत्र्यांनी बँक दिली, ज्या बँकेत कोट्यावधींचा व्यवहार होतो त्याच्या प्रमुख पदावर तरुणाची निवड केली’ अशी चर्चा अनुभवी राजकारण्यांनी केली. सांयकाळी सहाच्या सुमारास शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी अध्यक्षांच्याबाबत एक चर्चात्मक पोस्ट टाकली. वरील विषयासंबंधीत ही असलेली पोस्ट भाजपा कार्यकर्त्यांच्या पसंतीला उतरली. प्रारंभी हळुहळू भाजपा कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांनी केलेली निवड चुक असल्यचे समर्थन केले. तसेच ही पोस्ट टाकून तुम्ही आमची ‘खदखद’ व्यक्त केली अशी प्रतिक्रीया भाजपा कार्यकर्त्यांनी दिली. सारडा समर्थक चिडले. त्यांना प्रतिउत्तर देत पालकमंत्र्यांची निवड योग्य कशी आहे याचा पाढा वाचला. राजकारणात प्रत्येकजण शेवटपर्यंत शिकतच असतो, असा सूर त्यांनी लावला.सांयकाळी सहाच्या सुमारास सुरु झालेली पोस्टवरील चर्चा रंगत गेली. रात्री नऊच्या सुमारास वादाचे रुपांतर शिवीगाळ मध्ये झाले. सारडा समर्थक व भाजप कार्यकर्ते एकमेकांना अर्वाच्च भाषा वापरत पोस्ट टाकु लागले, रात्री आकरा पर्यंत जवळपास १४० पोस्ट झाल्या. शनिवारी सकाळी सात वाजल्यापासूनच पुन्हा सारडा समर्थक व भाजपा कार्यकर्ते आॅनलाईन झाले व त्यांनी पुन्हा कॉमेंट्स करण्यात सुरुवात केली. दुपारी बारा पर्यंत हा वादग्रस्त पोस्टचा वाद सुरु राहिला. हे प्रकरण हाता बाहेर जाईल म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी टाकलेली मूळ पोस्ट काढली. त्यामुळे बारा तास चालेलले आॅनलाईन युद्ध संपुष्टात आले.