शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाच आजारांसाठी एकच लस

By admin | Updated: July 6, 2015 00:20 IST

संजय तिपाले, बीड एक वर्षापर्यंतच्या बालकांना दोन वेगवेगळ््या लसी घ्याव्या लागत होत्या; परंतु आता फक्त एकाच इंजेक्शनमधून पाच आजारांचे नियंत्रण करता येणे शक्य होणार आहे. ‘

संजय तिपाले, बीडएक वर्षापर्यंतच्या बालकांना दोन वेगवेगळ््या लसी घ्याव्या लागत होत्या; परंतु आता फक्त एकाच इंजेक्शनमधून पाच आजारांचे नियंत्रण करता येणे शक्य होणार आहे. ‘हायफोकस’ जिल्ह्यातील बालकांसाठी ही खास लस विकसीत केली आहे. १ आॅगस्टपासून ही लस सरकारी दवाखान्यांमधून मोफत उपलब्ध होत आहे. अर्भकमृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.याआधी बालकांना त्रिगुणी (धनूर्वात, घटसर्प, डांग्या-खोकला प्रतिबंधक लस) व काविळ ब या दोन लसी स्वतंत्रपणे घ्याव्या लागत होत्या. मात्र, आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत २० टक्के बालके (एक वर्षाच्या आतील) श्वसनाच्या आजाराने मृत्यू पावतात, अशी माहिती उजेडात आली. त्यामुळे एक वर्षाखालील बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी त्रिगुणी, काविळ ब तसेच न्यूमोनिया अशा पाच आजारांसाठी एकच लस विकसीत करण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीडसह जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील बालकांना या लसीचा लाभ घेता येणार आहे. बालकांना (दीड महिने), (अडीच महिने) व (साडेतीन महिने) अशा तीन टप्प्यांत लसी द्यायच्या आहेत. पाच आजारांसाठी एकच लस आल्याने जादा इंजेक्शनपासून मुक्तता होईल.बीडसह राज्यभर एक वर्षाखालील कोवळ्या जीवांच्या मृत्यूचा टक्का चिंताजनक आहे. खासगी दवाखान्यात पाच आजारांवरील लसीची किंमत दीड हजार रुपयांपर्यंत आहे. हीच लस शासकीय दवाखान्यांमध्ये नि:शुल्क मिळणार आहे. जिल्ह्यात एक वर्षाच्या आतील बालकांची संख्या ५७ हजाराहून अधिक आहे. या सर्वांना लसीचा लाभ घेता येऊ शकतो.जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाविन्यपूर्ण लसीच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हास्तरावर एक तसेच तालुकापातळीवरही प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.बीड हायफोकसमध्ये असल्याने अर्भकमृत्यू कमी करण्यासाठी पाच आजारांवर एकच लस उपलब्ध करण्यात आली आहे. एक आॅगस्टपासून सर्व सरकारी दवाखान्यांत ही लस मोफत आहे. आपल्या बालकांना लसी आवश्य टोचून घ्याव्यात.- डॉ. एच. व्ही. वडगावे,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, बीड