शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी ट्रकवर आदळून एक ठार

By admin | Updated: August 30, 2014 00:00 IST

दैठणा : परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ताडपांगरी शिवारात दुचाकी ट्रकवर आदळून एक जण ठार झाल्याची घटना २८ आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

दैठणा : परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ताडपांगरी शिवारात दुचाकी ट्रकवर आदळून एक जण ठार झाल्याची घटना २८ आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ताडपांगरी शिवारात ट्रक क्रमांक (एम.एच.२९-८०३५) हा रात्री मध्य रस्त्यावर उभा होता. त्यावेळी शिवाजी व्यंकटराव लांडे (वय ४५ रा. शिरपूर ता. पालम) हे दुचाकी क्रमांक (एम.एच.२२-एल.६९१३) ने जात होते. परंतु ट्रकचे इंडिकेटर चालू नसल्यामुळे शिवाजी यांना ट्रक दिसला नाही. त्यामुळे दुचाकी ट्रकवर जावून जोराने आदळली. ही घटना २८ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये शिवाजी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात आणत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. याप्रकरणी दैठणा पोलिस ठाण्यात स्वाती शिवाजी लांडे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दैठणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर तरोने हे करीत आहेत. (वार्ताहर)