शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून एकाचा खून

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

बदनापूर : तालुक्यातील गेवराई बाजार येथे पूर्ववैमनस्यातून एका इसमाचा खून करण्यात आल्याची घटना १९ जुलै रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदनापूर : तालुक्यातील गेवराई बाजार येथे पूर्ववैमनस्यातून एका इसमाचा खून करण्यात आल्याची घटना १९ जुलै रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेवराई बाजार येथे १९ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान येथील आॅटोरिक्षा थांब्यावर शिवाजी जगन्नाथ गाडेकर (वय ४२) यास मागील भांडणाच्या कारणावरून यातील आरोपींनी शिवीगाळ करून चापटाबुक्याने मारहाण केली. जगदीश कुबेर याने पोटात चाकूचे तीन वार केले. शिवाजी यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी मयताचे भाऊ नंदकिशोर जगन्नाथ गाडेकर यांनी बदनापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले की, ‘सुमारे एक वर्षापूर्वी संगीता कुबेर व तिचा भाऊ संतोष लहाने यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी माझा भाऊ शिवाजी यास मारहाण झाली होती. त्याने याबाबत तक्रार केली होती. या जुन्या भांडणाच्या कारणावरून या आरोंपीनी त्याचा खून केला.’ असे नमूद केले होते. दरम्यान, या तक्रारीवरून संतोष लालाभाऊ लहाने, संगीता एकनाथ कुबेर, जगदीश एकनाथ कुबेर, ऋषिकेश एकनाथ कुबेर, लालाभाऊ पुंजाराम लहाने, राधाबाई लालाभाऊ लहाने (रा. गेवराई बाजार) यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि पंकज जाधव हे करीत आहेत. (वार्ताहर)मानेगावात अपघातजालना तालुक्यातील मानेगाव येथे एका लग्नसमारंभासाठी येत असलेली कार रामनगर रोडवर पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना रविवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. कारमध्ये सहा प्रवाशी बसलेले होते. कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान, यााबाबत पोलिसांत नोंद नव्हती.