शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

२५१ प्रकरणांत एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज

By admin | Updated: April 28, 2015 00:30 IST

हणमंत गायकवाड , लातूर वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाचे लातूर कार्यालय वेगवेगळ्या प्रकरणांनी बहुचर्चित झाले आहे़

हणमंत गायकवाड , लातूरवसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाचे लातूर कार्यालय वेगवेगळ्या प्रकरणांनी बहुचर्चित झाले आहे़ आता तर २५१ प्रकरणांमध्ये एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज दिल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे़ लाभार्थ्यांच्या जातीतही घोळ केला असून, एका प्रकरणात वेगळी तर दुसऱ्या प्रकरणात दुसरीच जात दर्शविल्याचे निदर्शनास आले आहे़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रादेशिक व्यवस्थापकांना प्रकरणनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत़ भटक्या विमुक्त जाती-जमातीतील लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली़ लातुरातही या महामंडळामार्फत २००२ पासून २०१४ पर्यंत हजारो लाभार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायासाठी कर्ज वितरित करण्यात आले़ परंतु, वाटप करणारी यंत्रणा पारदर्शक नसल्याचे अनेक उदाहरणे घडले आहेत़ आता माहितीच्या अधिकारात २५१ प्रकरणात एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ एकाच व्यक्तीची जातही वेगवेगळी दाखविली आहे़ धनादेश क्रमांकामध्ये व रक्कमेमध्ये फरकही आहे़ त्यातच कोणत्याही कर्ज प्रकरणाची वसुली झाली नसल्याचेही उघडकीस आले आहे़ नरसिंग लक्ष्मण गायकवाड यांना लोदगा लातूरचा रहिवाशी दाखवून त्यांची जात जोशी दाखविली आहे़ त्यांना शेळी प्रकरणात शेळी व्यवसायासाठी १० हजाराचे ४०१०६ धनादेश क्रमांकाने कर्ज वितरित केले आहे़ तर याच नावावर लोदगा औसा भोई जात दर्शवून शेळी व्यवसायासाठी १० हजाराचे कर्ज ४०१०५ या धनादेश क्रमांकाने कर्ज वितरित केले आहे़ लातूर तालुक्यात लोदगा गाव नाही मात्र औसा तालुक्यात आहे़ नरसिंग लक्ष्मण गायकवाड नेमके कोणत्या गावचे, कोणत्या तालुक्याचे आणि कोणत्या गावचे हे स्पष्ट नाही़ माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत सामाजिक कार्यकर्ते मल्लीकार्जुन भाईकट्टी यांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी केली़ मात्र महामंडळाकडून खुलासा झाली नाही़ त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे़ एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज व जात वेगळी, गाव वेगळे दाखवून २५१ कर्ज प्रकरणात कर्ज वितरीत केलेल्या प्रकरणाची संख्या १४ असून, हा घोळ एकट्या लातूर कार्यालयातला आहे़ संशय असलेल्या २५१ प्रकरणात १४ कोटी ८० लाख रूपयांचे कर्ज वितरित झाले आहे़ या प्रकरणात ना वसुली ना लाभार्थ्यांचा ठावठिकाणा अशीच परिस्थितीच आहे़ मागे एकदा अस्तित्वात नसलेल्या आणि त्या गावाचा रहिवाशी नसलेल्या एका नावावर कर्ज वसुलीची नोटीस या महामंडळाने पाठविली होती़ संबंधित ग्रामपंचायतीने अशा नावाचा व्यक्ती आमच गावात राहत नाही, राहत नव्हता, मागे कधीही नव्हता असा खुलासा केल्यानंतरही महामंडळाने स्वत:चीच वाजवून घेत आमचेच खरे असल्याचा दावा केला होता़ आता या २५१ प्रकरणांतही एकाच नावाची दोन व्यक्ती असू शकतात, असा खुलासा महामंडळ करीत आहे. जातीच्या घोळाबाबत मात्र वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाने कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची आर्थिक गुन्हे अपराध शाखेमार्फत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी केली आहे.