शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याला पाठविले सुटीवर

By admin | Updated: May 19, 2015 00:52 IST

औरंगाबाद : घातक रसायने खाम नदीत टाकलेल्या प्रकरणाच्या कंत्राटाची कागदपत्रे स्टरलाईट कंपनी पोलिसांना देत नाही.

औरंगाबाद : घातक रसायने खाम नदीत टाकलेल्या प्रकरणाच्या कंत्राटाची कागदपत्रे स्टरलाईट कंपनी पोलिसांना देत नाही. याशिवाय यासंदर्भातील कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यास कंपनीने पोलिसांसमोर हजर करण्याऐवजी सुटीवर पाठविले. स्टरलाईट कंपनी तपासात असहकार्य करीत असल्याचा युक्तिवाद पोलिसांतर्फे सोमवारी न्यायालयात करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी कंपनीचा चेन सप्लाय मॅनेजर अनिल रत्नपारखी याची पोलीस कोठडी न्यायालयाने एक दिवसाने वाढविली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे अनिल रत्नपारखी याला पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. अ. खान यांच्यासमोर हजर केले व आरोपीस पुन्हा पोलीस कोठडी वाढवून मागितली. यासाठी पोलिसांनी असा युक्तिवाद केला की, बालाजी केमिकल कंपनी, (इमरानी, ता. खरगोणी, मध्यप्रदेश) ही कंपनी बंद असताना स्टरलाईट कंपनीत उत्पन्न होणाऱ्या रसायनाची विक्री व वाहतुकीचा करार आशिष जैन व त्याचा भागीदार अनिल परिहार याच्याशी कशाच्या आधारे करण्यात आला, याचा शोध घेण्यात येत आहे. या कराराची कागदपत्रे उपलब्ध असूनही स्टरलाईट कंपनी ते पोलिसांना देण्यास टाळाटाळ करीत आहे. एवढेच नव्हे तर कंपनीचे असोसिएट आॅफिसर राजेंद्र डोईफोडे यांना चौकशीला हजर न करता कंपनीने त्यांना सुटीवर पाठवून चौकशीला असहकार्य केले आहे. आठ आरोपींना अटक गरजेचीपोलिसांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, सुमित खांबेकर, आगा खान, सोनू चव्हाण, अस्लम कलीम शेख, तुषार पाखरे, चंदन नागेंद्रसिंग या सहा जणांच्या टोळीस यापूर्वीच अटक करण्यात आली असून, कंपनीचा चेन सप्लाय मॅनेजर यालाही अटक केली आहे. खाम नदीत रसायन सोडण्याप्रकरणात अन्य ८ आरोपींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. ते आरोपी असे- आर. सी. मेहता (रा. ठाणे), प्रकाश चित्रोड (रा. वापी, गुजरात), आशिष जैन, अनिलसिंग परिहार (रा. मध्यप्रदेश) यांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे आवश्यक आहे. खाम नदीत घातक रसायने सोडणे हा नियोजित कट असून, पांढरपेशा आरोपींनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी हजारो मनुष्य, प्राण्यांच्या जिवांशी केलेला हा खेळ आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या आरोपींनी हजारो एकर जमीन नापीक करण्यासह जीवितास हानी पोहोचविल्याचा जोरदार युक्तिवाद पोलिसांनी केला आहे. कंपनीचा चेन सप्लाय मॅनेजर अनिल रत्नपारखी याला दि. ११ मे रोजी गुन्हे शाखेने अटक केली होती. त्याला न्यायालयाने दि. १५ मे व नंतर १९ मेपर्यंत कोठडी वाढवून दिली होती. रत्नपारखी याच्याकडे कंपनीच्या रसायनाची वाहतूक व विक्रीचे कंत्राट देणे, रसायने टँकरमध्ये भरणे, रसायन संबंधित कंपनीत पोहोचले की नाही, याची माहिती घेणे आदी महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे रत्नपारखी याच्या कोठडीत वाढ करण्याची पोलिसांची मागणी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी रत्नपारखीची कोठडी २० मेपर्यंत वाढविली. सहायक सरकारी वकील व्ही. डी. सपकाळ यांनी यात काम पाहिले.