शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणी लेखा कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: July 7, 2014 00:16 IST

जालना : वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या रक्कमेचा धनादेश देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या वरिष्ठ सहायक विनोद भांडवलेविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना : अंबड पंचायत समितीअंतर्गत सेवा केलेल्या मयत कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या रक्कमेचा धनादेश देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या लेखा विभागाच्या वरिष्ठ सहायक विनोद भांडवले याच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कर्मचारी जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होते. १७ जुलै २०१३ रोजी ते आजारपणामध्येच मयत झाले. त्यांच्या औषधोपचारासाठी झालेल्या खर्चाचा परतावा मिळण्यासाठी मयत कर्मचाऱ्याच्या पुत्राने वेगवेगळी वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम मिळण्याकरिता गटशिक्षणाधिकारी अंबड यांच्यामार्फत जि.प. जालना येथे प्रस्ताव दाखल केला होता. सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम मिळण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेने मंजूर करून गटविकास अधिकारी अंबड यांना पुढील कार्यवाहीबाबतचे आदेश दिलेले होते. सदर प्रतिपूर्तीपोटी १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश मिळण्यासाठी तक्रारदार (मयताचे पुत्र) हे संबंधित लिपिक भांडवले यांना जाऊन भेटले असता ते म्हणाले की, ‘धनादेश मीच तयार करून साहेबांची सही घेऊन तुम्हाला देणार आहे; परंतु त्यासाठी मला ५ हजार रुपये द्यावे लागतील.’ त्यावर तक्रारदार यांनी ‘वडील मयत झालेले आहेत, आमच्याजवळ कशाचे पैसे’ असे सांगितले. मात्र भांडवले म्हणाले की, ‘ते मला माहिती नाही, ५ हजार रुपये दिल्याशिवाय मी तुमचा धनादेश तयार करून साहेबांची सही घेऊन तुम्हाला देणार नाही’. त्यावेळी तक्रारदार नाईलाजास्तव हो म्हणाले. मात्र नंतर तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली. त्यावरून भांडवले यांच्या लाचेच्या मागणीची पडताळणी पं.स. येथे जाऊन पंचासमक्ष करण्यात आली होती. (प्रतिनिधी)सापळा अयशस्वी; मात्र लाच मागितल्याचे निष्पन्न३ जुलै रोजी पुन्हा सापळा लावला असता भांडवले यांनी तक्रारदार यांना थोडे थांबण्यास सांगितले. परंतु बराच वेळ थांबून देखील त्यांना धनादेश न मिळाल्याने तक्रारदार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना समक्ष भेटून भांडवले धनादेश देत नसल्याचे सांगितले. त्यावर गटशिक्षणाधिकारी यांनी भांडवले यांना बोलावून धनादेश का दिला नाही, याबाबत विचारून त्यांची कानउघाडणी केली व धनादेश देण्यास सांगितले. तेव्हा भांडवले यांनी सायंकाळपर्यंत धनादेश देतो, असे सांगून काही वेळाने चेक सुलताने यांच्याकडे दिल्याचे सांगितले. तक्रारदाराकडून पैसे घेण्याचे टाळले. सुलताने यांना फोनवरून चेक मिळाला किंवा कसे याबाबत खात्री केली असता त्यांनी धनादेश मिळाल्याबाबत सांगितले.