शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी महिलांसाठी अध्यक्षपद राखीव

By admin | Updated: June 11, 2016 00:15 IST

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेसह राज्यातील २६ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये अपेक्षित आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेसह राज्यातील २६ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये अपेक्षित आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपद हे ओबीसी महिलांसाठी राखीव झाले. तथापि, मार्च २०१२ मध्ये झालेल्या जि.प.च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्येदेखील अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद हे ओबीसी महिलांसाठीच राखीव होते. त्यानंतर अध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले ते सध्याही आहे. अडीच वर्षांच्या खंडांनंतर पुन्हा ओबीसी महिलांसाठी अध्यक्षपद राखीव झाल्यामुळे जिल्हा परिषदेत शुक्रवारी ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण दिसत होते.जि. प. अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याचे वृत्त वाऱ्यासरशी जिल्हा परिषदेत धडकले. तेव्हा जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, सभापती संतोष जाधव यांच्यासह काही सदस्यांमध्ये चर्चा रंगली. अनेकांचा अपेक्षाभंग झाला.दुसरीकडे, काही जणांनी अगोदरच आपल्या पत्नीचे जात प्रमाणपत्र हे ‘कुणबी मराठा’ असे काढून ठेवलेले आहे. ही जात ‘ओबीसी’मध्ये येते. त्यामुळे अशा काही सदस्यांनी सध्या तरी धीर सोडलेला नाही. असे असले तरी पुढे आपल्या गटाचे (सर्कल) आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी सुटते, त्यावर सर्व काही अवलंबून आहे, असा सावध पवित्रा घेत सदस्यांनी चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केला. मार्च २०१२ मध्ये जि.प.ची सार्वत्रिक निवडणूक झाली. तत्पूर्वी, जि. प. अध्यक्षपद हे अडीच वर्षांसाठी ओबीसी महिलेसाठी राखीव झाले होते. निवडणुकीत सातारा गटातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या नाहिदा बानो यांची अध्यक्षपदावर निवड झाली. काही महिन्यांनंतर त्यांच्या जात प्रमाणपत्राला न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्रच अवैध ठरविले. त्यामुळे त्यांच्या जागेवर काँग्रेसच्या सदस्य शारदा जारवाल यांची वर्णी लावण्यात आली. अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले. त्यामुळे काँग्रेसचे सदस्य श्रीराम महाजन हे अध्यक्षपदावर विराजमान झाले. आरक्षणाचे रोटेशन चुकीचे झाले, अशी प्रतिक्रिया सभापती संतोष जाधव, सदस्या पुष्पा जाधव यांनी व्यक्त केली.