शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात टॅँकरची संख्या घटली

By admin | Updated: July 5, 2016 00:28 IST

पाच तालुके मुक्त : आणखी कपात होणार

नाशिक : जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी, नाले खळाळून वाहू लागले असून, काही प्रमाणात विहिरींना पाणी लागल्याने त्याचा परिणाम टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर झाला असून, पाच तालुक्यांनी टॅँकर पूर्णपणे बंद केल्यामुळे अडीचशेवर असलेली टॅँकरची संख्या थेट दोनशेवर येऊन पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवार व रविवार तसेच सोमवारीही दिवसभर पावसाने हजेरी कायम ठेवल्यामुळे धरणांच्या पातळीत वाढ तर झालीच, परंतु कोरड्याठाक पडलेल्या नदी, नाले वाहू लागले आहेत. शेतकऱ्यांनीही शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. विशेष करून ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटण्यास हा पाऊस कारणीभूत ठरला असून, जूनच्या अखेरच्या आठवड्यात अडीचशेपर्यंत पोहोचलेली टॅँकरची संख्या दिवसागणिक घटण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात बारा टॅँकर घटले होते, आता तीच संख्या पन्नासवर पोहोचली आहे. नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, कळवण व पेठ या पाच तालुक्यांतील टॅँकर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय तहसीलदारांनी घेतला आहे. तरीदेखील निफाड, सिन्नर, येवला, मालेगाव, बागलाण, नांदगाव, चांदवड, देवळा या तालुक्यांतील २०४ गावे व ५२४ वाड्यांना दोनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)