आता मोघम ‘नमुना आठ’ वर बसणार चाप

By Admin | Updated: December 20, 2015 23:34 IST2015-12-20T23:26:07+5:302015-12-20T23:34:54+5:30

आखाडा बाळापूर : ग्रामपंचायमधील नमुना नंबर आठची नक्कल देताना ती सुरुवातीला मोघम स्वरुपात दिली जायची, परंतु यापुढे असे मोघम स्वरुपातील नक्कल देऊ नये,

Now it will sit on Magham 'Sample 8.' | आता मोघम ‘नमुना आठ’ वर बसणार चाप

आता मोघम ‘नमुना आठ’ वर बसणार चाप

आखाडा बाळापूर : ग्रामपंचायमधील नमुना नंबर आठची नक्कल देताना ती सुरुवातीला मोघम स्वरुपात दिली जायची, परंतु यापुढे असे मोघम स्वरुपातील नक्कल देऊ नये, त्यात मोजमाप, क्षेत्रफळ, व चतु:सीमा यांचा उल्लेख केलाच पाहिजे, असे सक्तीचे आदेश कळमनुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
प्लॉटमालक, जागामालक यांनी त्यांच्या मालकीहक्काचे विवरण करणारे, नमुना नंबर आठची नक्कल ग्रामपंचायत कार्यालयामार्फत देण्यात येते. ती नक्कल देताना ती मोघम स्वरुपात दिली जाते असे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्या नक्कलमध्ये जागेचे मोजमाप लिहिले जात नाही. जागेचे क्षेत्रफळ, त्याच्या चतु:सीमा याचा उल्लेख केल्यास त्या जागेबाबतची स्पष्टता दिसते. पण नमुना नंबर आठची नक्कल देताना ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी काम टाकण्यासाठी किंवा जागेबाबत संदिग्धता असल्याने मोघम स्वरुपात नक्कल देवून समोरच्याची बोळवण करतात. परिणामी, जागेबाबतचे अनेक वाद प्रशासनापुढे उभे राहतात. त्यासंबंधी १६ नोव्हेंबरच्या लोकशाही दिनात प्रश्न उपस्थित झाला होता. त्या अनुषंगाने कळमनुरी तहसीलदारांनी नमुना नंबर ८ मध्ये सर्व नोंदी असल्या -शिवाय, नमुना नंबर ८ ची नक्कल देवू नये असे आदेश दिले होते. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामविकास अधिकारी- ग्रामसेवक यांना आदेश दिले असून, सर्व नोंदीची नक्कल देण्यास सूचविले आहे. त्यामुळे आता जागेचे घोळ करणाऱ्यांची पंचाईत होणार आहे.

Web Title: Now it will sit on Magham 'Sample 8.'