शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर घरे बांधणाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: April 30, 2015 00:37 IST

लातूर : उद्योग भवन व सिग्नल कॅम्प परिसरातील ग्रीन बेल्टच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर १६ हजार फुट जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करुन पक्के घरे बांधली आहेत़

लातूर : उद्योग भवन व सिग्नल कॅम्प परिसरातील ग्रीन बेल्टच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर १६ हजार फुट जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करुन पक्के घरे बांधली आहेत़ या रस्त्यावर बांधण्यात आलेले घर अथवा कच्चे अतिक्रमण १५ दिवसात काढण्यात यावेत, अशा नोटिसा १० अतिक्रमण धारकांना मनपा आयुक्तांनी पाठविल्या आहेत़ नोटिसा पाठविलेल्या व्यक्ती शहरातील बड्या हस्ती आहेत. यामुळे खळबळ उडाली असून, सिग्नल कॅम्पला हादरा बसला आहे.लातूर इंडस्ट्रीयल स्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटी लि़ मधील मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर अतिक्रमण करुन काही लोकांनी रस्ता बंद केला आहे़ या रस्त्यावर काहींनी पक्के घरे बांधली आहेत़ काही लोकांनी शिकवणी वर्गाला ही जागा बांधकाम करुन भाड्याने दिली आहे़ गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेच्या या रस्त्यावर त्यांचे अतिक्रमण आहे़ यासंदर्भात २२ आॅक्टोबर २०१३ रोजी मनपा आयुक्तांकडे मल्लिकार्जून भाईकट्टी यांनी तक्रार केली़ या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत अतिक्रमण केलेल्या १० लोकांना २७ एप्रिल २०१५ रोजी नोटिसा पाठविल्या आहेत़ मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर पक्के /कच्चे बांधकाम त्वरीत काढावे़ अथवा १५ दिवसानंतर अतिक्रमण विभागाकडून ते काढण्यात येईल. स्वत:हून अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमण विभागाकडून ते काढण्यात येईल़ त्यावर झालेला खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल, असेही या नोटीसीत म्हटले आहे़ (प्रतिनिधी)केनिया मुकुंदराव कवरजी (आर८/४७), केनिया मुकुंदराव कवरजी (आर ८/४६), केनिया कस्तुर बेन (आर ८/४८), सुंदर बेन शांतीलाल शहा (आर ८/४९), प्रेमादेवी रमेशचंद्र भुतडा (आर ८/६९), रामेश्वर रामकिशन भराडिया (आर ८/७१), रमेशचंद्र नारायणदास भुतडा (आर ८/७०), मे़बसवेश्वर रीड इंडस्ट्रीज (आर ८/७३), मे़बसवेश्वर रीड इंडस्ट्रीज (आर ८/७२), स्रेहा असोसियशन (आर ८/७४), इंडस्ट्रील स्टेट सिग्नल कॅम्प, लातूर या दहा जणांना मनपाने नोटिसा बजावल्या आहेत़ इंडस्ट्रील स्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटी लि़ मधील मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी काही ठिकाणी पक्के तर काही ठिकाणी कच्चे बांधकाम केले आहे़ या अतिक्रमण धारकांना तक्रारीनुसार नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत़ तसेच त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे़ त्यांचे म्हणणे असमाधानकारक असेल, तर अतिक्रमण काढण्यात येईल़ परंतु त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे, असे महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़