शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची व्यावसायिकांना नोटीस

By admin | Updated: May 17, 2016 00:03 IST

नांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरात वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असून त्यामुळे या ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत़ याबाबत अनेकवेळा पोलिसांकडून कारवाईही केली जाते़

नांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरात वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असून त्यामुळे या ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत़ याबाबत अनेकवेळा पोलिसांकडून कारवाईही केली जाते़ परंतु या भागातील वाहतुकीचा प्रश्न अद्यापही सुटला नाही़ त्यावर तोडगा म्हणून आता पोलिसांनी दुकानासमोर अवैध पार्कींग करु देवू नये यासाठी व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत़ तसेच कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे़ देगलूर नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते़ त्यात हॉटेल आणि दुकानासमोर बेशिस्तपणे वाहनांची पार्कींग केली जाते़ तर रस्त्याच्या कडेला जड वाहने उभी केली जातात़ त्यामुळे दर महिन्याला या ठिकाणी अपघात होवून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे़ त्याचबरोबर वारंवार या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबाही होतो़ यावर अनेकवेळा कारवाई करुनही या ठिकाणच्या बेशिस्त वाहतुकीला अद्यापही शिस्त लागली नाही़ त्यामुळे आता पोलिसांनी बेशिस्त पार्कींगसाठी थेट व्यावसायिकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार, १९७३ च्या कलम १४९ नुसार दुकान, हॉटेल, घरासमोर कोणत्याही प्रकारे अवैध स्वरुपाची पार्कींग होवू देवू नये़ अन्यथा १८६० चे कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल अशा आशयाची नोटीस उपअधीक्षक अशोक बनकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आली आहे़ अशाप्रकारे परिसरातील अनेक व्यावसायिकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत़ पोलिसांच्या या बडग्यामुळे तरी, या भागातील वाहतुकीला शिस्त लागेल असे शक्यता वर्तविली जात आहे़ दरम्यान, जुना नांदेड परिसरात आतापर्यंत शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी फिरकत नव्हते आता मात्र त्यांचे पॉर्इंट लावण्यात आले आहेत़