शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नोटीस बजावणाऱ्यासच अखेर मिळाली नोटीस!

By admin | Updated: October 7, 2014 00:14 IST

बदनापूर : बदनापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना गैरहजर दाखवून त्यांना कारणे दाखवा नोटिसा देणा-या संबंधित

बदनापूर : बदनापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना गैरहजर दाखवून त्यांना कारणे दाखवा नोटिसा देणा-या संबंधित कक्षप्रमुखास याबाबत नोटीस देण्यात आली आहे.निवडणूक काळात एखाद्या कर्मचाऱ्याला निवडणुकीच्या कामात दिरंगाई केल्याबाबत जर एखादी कारणे दाखवा नोटीस आली तर या कर्मचाऱ्याला घामच फुटतो. पण बदनापूर विधानसभा मतदारसंघात गैरहजर नसतानाही कारणे दाखवा नोटिसा दिल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे.बदनापूर विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकरीता नुकतेच पहिले प्रशिक्षण संपन्न झाले त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी असे एकूण १७२७ पैकी १५७४ हजर व १५३ कर्मचारी गैरहजर दाखविण्यात आले होते. त्यामुळे एवढ्या मोठया प्रमाणात असलेल्या गैरहजेरीची मोठी चर्चा झाली होती .मात्र या प्रशिक्षणात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी हजेरी घेण्याकरीता ठेवलेल्या वेगवेगळ्या टेबलांवर ठेवण्यात आलेल्या हजेरी रजिस्टरवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तसेच काही कर्मचारी अन्य मतदारसंघात निवडणूक कामांकरिता नियुक्त होते. तर काही या मतदारसंघातच असलेल्या कामांकरिता नियुक्त केलेले होते अशाप्रकारे १५३ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ३० ते ४० कर्मचारीच गैरहजर होते. त्यामुळे गैरहजर दाखविलेले कर्मचारी निवडणुकीचे काम करीत असतानाही त्यांना गैरहजर दाखविण्यात आले अशा हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने या प्रशिक्षणात हजर नसल्याबाबत कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या, मात्र या कर्मचाऱ्यांनी आपण निवडणुकीच्या कामातच असल्याचे संबंधितांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे त्यांची यातून सुटका झाली मात्र संबंधितांनी कार्यतत्परता दाखवत दिलेल्या माहितीमुळे या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम करूनही मानसिक मनस्ताप सहन करावा लागला. (वार्ताहर)