शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केवळ चर्चा करणारा मध्यमवर्गीय नको

By admin | Updated: May 29, 2015 01:03 IST

औरंगाबाद : देशातील विविध प्रश्नांवर आज मध्यमवर्गीय नुसती चर्चा आणि टीका करतात आणि सोडून देतात. परंतु त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी स्वत:चा वाटा काय राहील,

औरंगाबाद : देशातील विविध प्रश्नांवर आज मध्यमवर्गीय नुसती चर्चा आणि टीका करतात आणि सोडून देतात. परंतु त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी स्वत:चा वाटा काय राहील, यासाठी काहीही करताना दिसत नाही. देश चांगला पाहिजे, मात्र त्यासाठी आपले काहीही खर्च होणार नाही, अशा प्रवृत्तीमधून बाहेर पडण्याची गरज असल्याची भावना ‘एएमए’तर्फे आयोजित ‘रेअर शेअर’ कार्यक्रमात गुरुवारी सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केली.देवगिरी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगमध्ये सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी प्रशांत देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. सुनील देशपांडे, डॉ. उल्हास शिऊरकर, सतीश कागलीवाल यांची उपस्थिती होती. यावेळी सुनील केंद्रेकर यांनी शासकीय सेवेत कामकाज करताना आलेल्या अनेक अनुभवांवर प्रकाश टाकला. त्यांनी सध्याच्या परिस्थितीविषयी काहीशी चिंता व्यक्त केली. कोणत्याही बाबींची माहिती नसताना थेट टिपणी क रण्यावर भर दिला जात आहे. स्वत: झाडे लावायचे नाहीत, कचरा उचलायचा नाही; परंतु त्यावर टीका करायची आणि केवळ निराशावादी बोलायचे. यातून बाहेर पडले पाहिजे. देशासाठी काय चांगले करू शकतो, याचा विचार करण्याची गरज असल्याचे केंद्रेकर म्हणाले.आपल्याला हेच करायचे अशा प्रकारे करिअरचे मी कधीही प्लॅन केले नव्हते. शिवाय आजही मी पुढच्या मिनिटांचा विचार करतो. औरंगाबादेतच अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मी नियमित विद्यार्थी नव्हतो. परंतु तरीही चांगले मार्क मिळविले. त्यावेळी घरून महिन्याला १२५ रुपये मिळायचे. अशा परिस्थितीत एक वेळ जेवून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले.