शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

असहकार आंदोलन

By admin | Updated: February 17, 2016 23:02 IST

कळमनुरी: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाच्या उदासीन धोरणामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन राज्य महासंघाने असहकार आंदोलनाचा निर्णय घेतला.

कळमनुरी: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाच्या उदासीन धोरणामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन राज्य महासंघाने असहकार आंदोलनाचा निर्णय घेतला.१८ तारखेपासून बारावीच्या उत्तरपत्रिका संथगतीने तपासून महाराष्ट्रभर हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातील ६० हजार शिक्षक सहभागी होणार आहेत. प्रमुख मागण्यांमध्ये आॅनलाईन संच मान्यतेतील सर्व त्रुटी दूर करून प्रचलित निकषानुसार संचमान्यता करण्यात यावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकन पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे, चोवीस वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी देण्यात यावी, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन स्वतंत्र करण्यात यावे, एम.फिल., पीएच.डी.साठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वरिष्ठ महाविद्यायीन शिक्षकाप्रमाणे लाभ द्यावा, कायम शिक्षकांना कार्यभार सलग तीन वर्षे २५ टक्क्यांपेक्षा कमी होईपर्यंत त्यांना अतिरिक्त ठरवू नये, स्वयंअर्थसहायित महाविद्यालयांना बृहत आराखड्यानुसार आवश्यकता असल्यासच परवानगी द्यावी, अभियांत्रिकी प्रवेशासाठी १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणांना व सीईटीच्या गुणांना ५०-५० टक्के धरुनच मेरीट लिस्ट बनवावी, उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांच्या ग्रेड पेमध्ये वाढ करावी इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राज्य अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, सरचिटणीस प्रा. संजय शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन थोरात असोलेकर, सचिव प्रा. सुनील कावरखे, उपाध्यक्ष प्रा. येवले, प्रा. संजय चाटे, सहसचिव प्रा. मस्के, कोषाध्यक्ष प्रा. यू.आर. नगराह, प्रा. प्रमोद पवार, प्रा. माधव रोेडगे, प्रा. सुदर्शन देशमुख, प्रा. रमेश वाहूळे, प्रा. राम तोडकर यांनी केले आहे. (वार्ताहर)