शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

ना पाण्याची, ना राहण्याची सुविधा

By admin | Updated: July 20, 2014 00:35 IST

उद्धव चाटे, गंगाखेड स्वातंत्र्यपूर्व काळापासून सेवेत असलेल्या येथील रेल्वेस्थानकावर ना पाण्याची सुविधा आहे ना राहण्याची़ त्यामुळे रेल्वेस्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असुविधांचा सामना

उद्धव चाटे, गंगाखेडस्वातंत्र्यपूर्व काळापासून सेवेत असलेल्या येथील रेल्वेस्थानकावर ना पाण्याची सुविधा आहे ना राहण्याची़ त्यामुळे रेल्वेस्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असुविधांचा सामना करीतच प्रवास करावा लागतो़ रेल्वे प्रशासनाचे सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे़ गंगाखेड तालुका हा मराठवाड्याच्या मध्यभागात वसलेला तालुका आहे़ व्यापारी दृष्टीकोनातून या तालुक्याचे महत्त्व मोठे आहे़ गंगाखेड येथे १९५१ साली रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली़ सुरुवातीच्या काळात मीटरगेज असलेली रेल्वे १९९२ मध्ये ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित झाली़ परंतु, सुविधा मात्र मिळाल्या नाहीत़ स्थानकाच्या निर्मितीपासूनच प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागतो़ या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही, विश्रामगृह, स्वच्छतागृहदेखील नाही़ त्यामुळे एखाद्या प्रवाशाचा रात्रीच्या वेळी स्थानकावर मुक्काम पडला तर त्याला मोठ्या अडचणीतून जावे लागते़ गंगाखेड येथून मुंबई, पुणे, नागपूर, विजयवाडा, हैदराबाद, आदिलाबाद, कोल्हापूर, अमरावती, सिकंदराबाद, निजामाबाद, औरंगाबाद, नांदेड, परभणी, परळी, बेंगलोर आदी गावांना रेल्वेने जोडले आहे़ संत जनाबाई यांचे जन्मस्थळ असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने शहरात येतात़ व्यापाऱ्यांचा मालही या ठिकाणी रेल्वेद्वारे येतो़ यामुळे या रेल्वे स्थानकाचे महत्त्व मोठे आहे़ सुखकर प्रवास होत असल्याने प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात़ परंतु, सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ रेल्वे प्रशासनाने या बाबीकडे लक्ष घालून प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे़२८ रेल्वेगाड्यांची ये-जागंगाखेड रेल्वेस्थानकावरून दिवसभरात २८ रेल्वे गाड्यांची ये-जा असते तर ३० ते ३५ मालगाड्या या स्थानकावरून जातात़ गंगाखेड हे महत्त्वाचे स्थानक असल्याने या ठिकाणी प्रवाशांची संख्यादेखील मोठी आहे़ परंतु, एकच तिकीट खिडकी सुरू असते़ रेल्वेस्थानकावर सुरक्षा रक्षकाचाही अभाव आहे़ त्यामुळे या ठिकाणी रात्री ८ नंतर थांबण्यास प्रवाशांना असुरक्षित वाटते़ सिग्नलच्या पुढे जाऊन रेल्वे मागे परतलीयेथील रेल्वेस्थानकामधून १७ जुलै रोजी सायंकाळी ६़३० च्या सुमारास पूर्णा-परळी ही पॅसेंजर गाडी रवाना झाली होती़ सिग्नलच्या पुढे जाऊन समोर थोडा चढाचा भाग असल्यामुळे इंजीनवर लोड आला व गाडी पुढे जात नसल्याने ती पुन्हा मागे घेण्यात आली़ विशेष म्हणजे समोरच्या बाजूने पंढरपूर-निजामाबाद ही गाडी वडगाव स्टेशन येथे क्रॉसिंगसाठी उभी होती़ दोन्ही गाड्या समोरासमोर आल्या असत्या तर अनर्थ झाला असता़ दोन्ही गाड्या एकाच वेळी सुटल्या असा प्रवाशांनी अंदाज काढला़ परंतु, चढाचा भाग असल्यामुळे रेल्वे इंजीन लोड घेऊ शकले नाही, असे गंगाखेडचे स्टेशन मास्टर टी़डी़ प्रसाद यांनी सांगितले़ गंगाखेड रेल्वे स्थानक ६० वर्षांचे जुने असून, सुविधा मात्र नाहीत़८० हजारांचे उत्पन्नगंगाखेड रेल्वेस्थानकावरून दररोज दोन हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात़ बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे़ दिवसाकाठी ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न या स्थानकातून रेल्वेला मिळते़ याचाच अर्थ महिन्याकाठी २५ लाखांचे उत्पन्न देणारे हे स्थानक आहे़