शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लातूरात ‘नो एन्ट्री’

By admin | Updated: January 14, 2015 00:57 IST

उस्मानाबाद : अतिरिक्त ठरलेल्या ८२ निमशिक्षकांचे लातूर जिल्हा जिल्हा परिषदेअंतर्गतच्या (झेडपी) शाळांमध्ये समायोजन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असतानाच लातूरच्या

उस्मानाबाद : अतिरिक्त ठरलेल्या ८२ निमशिक्षकांचे लातूर जिल्हा जिल्हा परिषदेअंतर्गतच्या (झेडपी) शाळांमध्ये समायोजन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असतानाच लातूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्र सोमवारी येथील शिक्षण विभागात धडकले. ‘आमच्याकडे खाजगी शिक्षक अतिरिक्त आहेत, त्यामुळे ८२ निमशिक्षकांना सामावून घेता येणार नाहीत’, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मागील काही महिन्यांपासून गाजत आहे. अनेकवेळा धरणे, उपोषण आदी प्रकारची आंदोलने झाली. परंतु, रिक्त जागा नसल्याने शिक्षण विभागाकडूनही ‘जसजशा जागा रिक्त होतील, त्यानुसार नियुक्त्या देऊ’, हे ठरलेले उत्तर दिले जात होते. तर दीड-दोन महिन्यांपासून नवीन संच मान्यतेचे गाजर दाखविले जात होते. असे असतानाच शिक्षण उपसंचालकांनी घेतलेल्या बैठकीत लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत जागा रिक्त असल्याचे समोर आले होते. त्यानुसार उपसंचालक खांडके यांनी लातूर ‘झेडपी’ला पत्र देवून ८२ अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याचे निर्देश दिले होते. त्याची एक प्रत उस्मानाबाद ‘झेडपी’लाही देण्यात आली होती. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला होता. दरम्यान, उपसंचालकाच्या पत्रानुसार समायोजनाच्या अनुषंगाने प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. ही संचिका सामान्य प्रशासन विभागातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलावर गेली होती. ही प्रक्रिया सुरू असतानाच लातूर जिल्हा परिषदेने खाजगी शाळांवरील अतिरिक्त शिक्षकांचे कारण पुढे करीत, ‘८२ निमशिक्षकांना घेता येणार नाही’ असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया थंड झाली असून लातूरकडून मिळालेल्या ‘रेड सिग्नल’मुळे शिक्षण विभागासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)जिल्हा बदलीने लातूर जिल्हा परिषदेत जाण्यासाठी जवळपास ५२ ते ५५ गुरूजी इच्छुक आहेत. त्यामुळे अगोदर सदरील गुरूजींना येथून सोडावे.त्यानंतर त्यांच्या जागी येथील अतिरिक्त गुरूजींचे समायोजन करावे. याउपरही जे कोणी अतिरिक्त ठरतील, त्यांनाच लातूर जिल्हा परिषदेकडे पाठवावे, अशी काही शिक्षकांची भूमिका आहे. तसेच याबाबत शिक्षक संघटनांनीही निवेदन दिले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार लातूर जिल्ह्यात जागा रिक्त आहेत. त्यामुळे सदरील रिक्त जागांवर अगोदर अतिरिक्त ठरलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांचा विचार केला जाईल. यानंतही जागा रिक्त राहिल्या तर त्या ठिकाणी खाजगी शिक्षांना सामावून घेण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक वैजिनाथ खांडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगिले. याबाबत जिल्हा परिषदेला लवकरच पत्र काढण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. मागील काही महिन्यांपासून ४३ निमशिक्षक नियुक्तीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला खेट मारीत आहेत. परंतु, जागा रिक्त नसल्याने त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत. असे असतानाच आता अतिरिक्त ठरलेल्या या ८२ शिक्षकांच्या नियुक्तीचा तिढा अधिक घट्ट झाला आहे.