शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

औरंगाबादच्या शासकीय कर्करोग रुग्णालयाने दिली हजारो रुग्णांना नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 9:50 PM

शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्था सातव्या वर्षांत पदार्पण करीत आहे.

ठळक मुद्दे२००८ मध्ये रुग्णालयाला मंजुरी मिळाली आणि २१ सप्टेंबर २०१२ रोजी हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल झाले.औरंगाबादेत कर्क रोग रुग्णालय सुरू झाले आणि आता अर्ध्या राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ते आता आशेचा किरण ठरत आहे.

औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्था सातव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून कर्करोगाचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. अर्ध्या महाराष्ट्रातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवड आणि नवसंजीवनी देणारे ठरत असून, ६ वर्षांच्या कालावधीत हजारो रुग्णांना येथील उपचारामुळे नवे जीवन मिळाले आहे.

घाटी रुग्णालयातील किरणोपचार विभागात कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार होत असताना रुग्णांसोबत अनेकदा त्यांचे नातेवाईकही घाटीच्या आवारात फुटपाथवर थांबलेले दिसत. कॅन्सर रुग्णांसाठी शासन स्तरावर केवळ मुंबईमध्ये रुग्णालय होते. त्यामुळे मुंबईला जाण्याची नामुष्की गोरगरिबांवर ओढावत होती. कर्करोगाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय औरंगाबादेत उभारावे, यासाठी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आणि मंजूर करून घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आमखास मैदानासमोरील जागाही मिळवून दिली. २००८ मध्ये रुग्णालयाला मंजुरी मिळाली आणि २१ सप्टेंबर २०१२ रोजी हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल झाले.

औरंगाबादेत कर्क रोग रुग्णालय सुरू झाले आणि आता अर्ध्या राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ते आता आशेचा किरण ठरत आहे. रुग्णालयात मराठवाड्यासह धुळे, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, अहमदनगर, जळगाव,नाशिकसह १८ ते १९ जिल्ह्यांतून रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन रुग्णसेवेत भर पडत आहे.

रुग्णसंख्या २२ हजारांवरून ४७ हजारांवररुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात २०१३ मध्ये २२ हजार १२० रुग्णांवर उपचार क रण्यात आले. ही संख्या दरवर्षी वाढून २०१७ मध्ये ४७ हजार २२४ इतक्यावर पोहोचली. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये मुखकर्करोगाचे प्रमाण अधिक आहे, तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

रुग्णालयाची प्रगतीसहा वर्षांत रुग्णालयाची मोठी प्रगती झाली आहे. विस्तार होऊन राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा सुरूआहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार होत आहेत.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

अर्ध्या महाराष्ट्रातून रुग्णरुग्णालयात उपचारासाठी अर्ध्या महाराष्ट्रातून म्हणजे १८ ते १९ जिल्ह्यांतून रुग्ण येतात. राज्य कर्करोग रुग्णालयाच्या दर्जामुळे आगामी कालावधीत अद्ययावत यंत्रे दाखल होतील. त्यामुळे आणखी चांगली रुग्णसेवा देता येईल.- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्यअधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय

आकडेवारीत राज्य कर्करोग संस्थेचा आढावा : (२१ सप्टेंबर २०१२ ते ३० आॅगस्ट २०१८)बाह्यरुग्ण विभाग - २ लाख १२ हजार १६६आंतररुग्ण विभाग- २४ हजार ४४१लिनिअर एस्केलेटर - ४ हजार ८७कोबाल्ट युनिट - १ हजार ४२२ब्रेकी थेरपी - १ हजार ५३२डे केअर केमोथेरपी - ३८ हजार ४८४मोठ्या शस्त्रक्रिया - ४ हजार २३२छोट्या शस्त्रक्रिया - ३ हजार ६५

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य