शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीच्या अपहरणाच्या संशयातून शेजारील युवकाची हत्या; घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:06 IST

संशयावरून तरुणाच्या अल्पवयीन भावाचा तीक्ष्ण हत्याराने खून आणि त्याच्या आई-वडिलांना गंभीर जखमी केले

ठळक मुद्देवैजापूर पोलीस ठाण्यात खून व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल दोन आरोपींना अटक करण्यात आली

वैजापूर (जि. औरंगाबाद) : प्रेम प्रकरणातून तरुणीचे अपहरण केल्याच्या संशयावरून तरुणाच्या अल्पवयीन भावाचा तीक्ष्ण हत्याराने खून आणि त्याच्या आई-वडिलांना गंभीर जखमी केल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. 

या घटनेतील २० वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत शुक्रवारी दाखल आहे. भीमराजचा मोठा भाऊ अमोल बाबासाहेब गायकवाड याने प्रेम प्रकरणातून तिचे अपहरण केल्याचा संशय देवकर कुटुंबियांना होता. अमोलदेखील शुक्रवारपासून गावात नाही. अमोलचे कुटुंब लाख खंडाळा गावापासून सहा कि.मी. अंतरावरील वस्तीवर राहते तर देवकर यांचे घर लाख खंडाळा येथे आहे. तरुणीचे अपहरण झाल्याच्या संशयातून देवीदास व रोहिदास हे दोघे तलवारीसारखे तीक्ष्ण हत्यार घेऊन शनिवारी रात्री आठवाजेच्या सुमारास वस्तीवर धडकले. बाहेर झोपलेल्या भीमराजवर हल्ला करून दोघांनी त्याला ठार केले व नंतर आई -वडिलांनाही जखमी केले. 

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अलकाबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून देवीदास देवकर व रोहिदास देवकर या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात खून व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर करीत आहेत.  

राखीव पोलिसांची तुकडी तैनातघटटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, राखीव पोलिसांच्या तुकडीसह दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असून, गावात शांतता आहे, अशी माहिती उपविभागिय पोलीस अधिकारी गोपाल रांजणकर यांनी दिली.