शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

फुले-शाहू-आंबेडकरांच्या शैक्षणिक धोरणाची गरज

By admin | Updated: January 12, 2015 14:16 IST

बहुजन समाजाच्या विकासासाठी शाहू महाराजांनी शिक्षणावर २३ टक्के खर्च करून शिक्षण सक्तीचे केले. परंतु, आजच्या परिस्थितीत शिक्षणावरील खर्च २ टक्क्यांवर आला आहे.

लातूर : बहुजन समाजाच्या विकासासाठी शाहू महाराजांनी शिक्षणावर २३ टक्के खर्च करून शिक्षण सक्तीचे केले. परंतु, आजच्या परिस्थितीत शिक्षणावरील खर्च २ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आज फुले-शाहू-आंबेडकरांचे शैक्षणिक धोरण राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी येथे केले.महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद आयोजित राज्यव्यापी शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्यात दिवाणजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्यंकटराव जाधव होते. मंचावर शिवाजी सोमवंशी, एकनाथराव कर्‍हाळे, आनंद मुसळे, इम्रान सय्यद, महेश आचवले, कादीर जागीरदार, प्रा. केशव आलगुले, मनोज भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संभाजीराजे म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकरांनी शिक्षणासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्र करून त्यांच्या कल्याणासाठी शैक्षणिक कार्य केले. शाहू महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. छत्रपती शाहू महाराजांप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास करण्यासाठी मी राज्यभर फिरत आहे. बहुजनांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न राहील. महात्मा फुले यांनी स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या माध्यमातून शंभर वर्षांपूर्वी शिक्षणाचा विषय समाजासमोर मांडला. याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शिक्षकांच्या प्रश्नांबाबत योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. सूत्रसंचालन गोविंद लहाने यांनी केले. तर आभार आनंद मुसळे यांनी मानले. यावेळी रेहान देशमुख, समीर देशमुख, शहुर बागवान, मनोज भिसे, पद्माकर आयनिले, पांडुरंग पवळे, मनीषा जगताप, केशव आलगुले, श्रीकृष्ण पाटील, राहुल पाटील, यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)