शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जातीनिहाय जनगणना होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST

औरंगाबाद : राष्ट्रीय जनगणना होत असताना ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ...

औरंगाबाद : राष्ट्रीय जनगणना होत असताना ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. जातीनिहाय जनगणना झाल्यास चित्र स्पष्ट होऊन संबंधित समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

एका खासगी कार्यक्रमासाठी पंकजा शहरात आल्या होत्या. सोबत खा. डॉ. प्रीतम मुंडे होत्या. जालना येथील ओबीसी मोर्चात सहभागी नसल्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, उपस्थित नसले तरी त्या चळवळीचा गेल्या अनेक वर्षांपासून मी भाग आहे. ओबीसी समाजाची जनगणना व्हावी, ही मागणी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संसदेत केली होती. आता खा. प्रीतम मुंडे हा विषय सभागृहात मांडत आहेत. आता जनगणना होणार असून सकारात्मक पाऊले उचलत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. ओबीसी मोर्चात ‘आता मुख्यमंत्री ओबीसी’ असे बॅनर झळकले. ओबीसी म्हणून आपण या पदावर योग्य आहात, या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना पंकजा म्हणाल्या, त्याला सहा वर्षे झाली आहेत. तो विषय मागे पडला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मागील सरकारने व्यवस्थित हाताळला. सध्या समाजाची निराशा झाली असून ओबीसीच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका आहे. सततची नोकरभरती थांबविणे अन्यायकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

त्या प्रकरणाचे राजकीय भांडवल नाही

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भात विचारले असता पंकजा म्हणाल्या, तो विषय आता मागे पडला असून नैतिक, कायदेशीरदृष्टया त्या गोष्टींचे समर्थन मी करीत नाही. परंतु हा विषय कुणाचाही असता तरी राजकीय भांडवल केले नसते आणि करणारही नाही. पण अशा प्रकारामुळे एखादे कुटुंब, त्या कुटुंबातील दोष नसलेल्यांना त्रास होतो. एक महिला म्हणून याकडे संवेदनशीलरित्या पाहते, असेही त्यांनी स्पष्ट केले.