शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
2
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
3
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
4
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
5
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
6
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
7
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
8
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
9
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
10
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
11
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
12
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
13
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
14
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
15
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
16
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
18
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
19
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
20
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तात खड्डे खोदकाम

By admin | Updated: May 7, 2014 00:39 IST

वाशी : तालुक्यातील दहीफळ येथील वृक्षांची कत्तल करून वनविभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे.

वाशी : तालुक्यातील दहीफळ येथील वृक्षांची कत्तल करून वनविभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी गेले असता, ही मोही अडविण्यासाठी कोणीही आले नाही. त्यामुळे मंगळवारी दिवसभर १८ जेसीबीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दहीफळ, शेंडी, तांदुळवाडी, गोलेगाव, वाशी, ब्रह्मगाव, हातोला आदी ठिकाणी शासकीय जमिनीवर वन विभागाने वृक्ष लागवड केली आहे. परंतु, या वृक्षांची कत्तल करून अनेकांनी शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या प्रकाराबाबत वन विभागाने पोलिसांकडे तक्रार दिली होती. याची दखल घेत पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या अधिपत्याखाली विशेष कृती दलाचे ५० जवान, वाशी व कळंब येथील २५ पोलिस कर्मचारी व तीन अधिकार्‍यांसह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी ५० एकरावरील अतिक्रमण हटवण्यास मंगळवारी दहीफळ येथे सकाळीच दाखल झाले होते. सदरील पोलिस फौजफाटा पाहून एकही अतिक्रमणधारक तेथे थांबला नाही. अथवा मोहीम अडविण्यासाठीही आले नाहीत. त्यामुळे वन विभागाने तगड्या पोलिस बंदोबस्तात दिवसभर १८ जेसीबीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदकाम केले. यावेळी वाशीचे पोलिस निरीक्षक शहाजी शिंंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद म्हेत्रेवार, पोलिस उपनिरीक्षक मारूती शेळके यांच्यासह वन विभागाचे कामाजी पवार, भूमच म्हेत्रे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर) वाशी तालुक्यातील दहीफळप्रमाणेच इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर शासकीय वनातील वृक्षतोड करण्यात येत आहे. वृक्षतोड करून जमिनी वहितीखाली आणल्या आहेत. या जमिनीवरील अतिक्रमणे कधी हटविणार असा, प्रश्न शेतकर्‍यांतून उपस्थित केला जात आहे.