शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला डीसीसी निवडणुकीत निवडून येण्याचा विश्वास तर राष्ट्रवादी निरूत्साहीच

By admin | Updated: April 20, 2015 00:36 IST

शिरीष शिंदे, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जवळ येत असून, भाजपाने बँकेवर ताबा मिळविण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रवादीचा निरूत्साह कायम आहे.

शिरीष शिंदे, बीडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जवळ येत असून, भाजपाने बँकेवर ताबा मिळविण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रवादीचा निरूत्साह कायम आहे.डीसीसीच्या निवडणुकीसाठी पाच मे रोजी मतदान होणार आहे. सोसायटीच्या ११, महिलांच्या २, वि.जा.भ.ज. साठी १, अनुसूचित जाती-जमातीसाठी १, इतर मागासवर्गीय १, पगारदार, पतसंस्था १, प्रक्रिया १ व इतर १ अशा १९ जागांसाठी मतदान होत आहे. सद्य परिस्थिती पाहता जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक बिनविरोध निघण्याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत.दरम्यान, गेवराई, बीड, आष्टी, पाटोदा, वडवणी येथील संस्था मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत तर परळी, केज, धारूर, अंबाजोगाई येथे राष्ट्रवादीला भाजपाशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. प्रक्रिया १, इतर शेती संस्था १ व नागरी बँक १ यासाठी मोठी लढत होणे अपेक्षित आहे. उर्वरित महिला, ओबीसी, व्हीजेएनटी, एससी, एसटी या पाच जागांसाठी सर्वांचे मतदान असणार आहे. एकंदरीत आढावा घेतला तर भाजपाचे वर्चस्व अधिक दिसून येत आहे.डीसीसी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते आतापर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार निरूत्साही दिसून येत आहेत. राकाँने निवडणुकीसाठी पॅनल तयार केले नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापल्या भागातून अर्ज दाखल केले आहेत. डीसीसी निवडणुकीच्या आखाड्यात एकूण १६२ उमेदवार आहेत. २४ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. परंतु शनिवारपर्यंत अद्याप एकाही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतलेला नव्हता. पुढील चार दिवसांमध्ये कोण अर्ज मागे घेतो हे समजून येईल. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.दरम्यान, सोसायटीसाठी ६९९, इतर शेतीसाठी ५२८, प्रक्रियाचे ६५, पगारदार पतसंस्थेचे १३२ असे मिळून १ हजार ४२४ मतदार डीसीसीच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत.राष्ट्रवादी व भाजपा पक्षातील अनेक दिग्गज या निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे डीसीसीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.