नव्वद अपंग बनले स्वावलंबी

By Admin | Updated: May 24, 2014 00:41 IST2014-05-24T00:30:59+5:302014-05-24T00:41:59+5:30

विलास चव्हाण, परभणी येथील जिल्हा परिषद समाजकल्याण अपंग विभागाच्या वतीने बीजभांडवल योजनेंतर्गत २० टक्के अनुदानावर जिल्ह्यातील तब्बल ९० अपंग

Naveed crippled self-supporting | नव्वद अपंग बनले स्वावलंबी

नव्वद अपंग बनले स्वावलंबी

विलास चव्हाण, परभणी येथील जिल्हा परिषद समाजकल्याण अपंग विभागाच्या वतीने बीजभांडवल योजनेंतर्गत २० टक्के अनुदानावर जिल्ह्यातील तब्बल ९० अपंग लाभार्थ्यांना १४ लाख ९४ हजार ८०० रुपये वाटप करण्यात आल्याने अपंग लाभार्थी स्वावलंबी झाले आहेत. शासनाच्या वतीने अपंगांनाही समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो अपंग विकासाच्या प्रवाहामध्ये येत आहेत. शासनाच्या वतीने जिल्हा परिषद समाजकल्याण अपंग विभागाच्या वतीने बीजभांडवल योजनेंतर्गत मार्च २०१३-१४ याकरिता २० टक्के अनुदानावर जिल्ह्यातील ९० अपंग लाभार्थ्यांना तब्बल १४ लाख ९४ हजार ८०० रुपये वाटप करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत अपंग लाभार्थी किराणा, सुतार, हॉटेल, भांड्याचे दुकान, जनरल स्टोअर्स आदी दुकाने टाकून आपल्यासह कुटुंबाचा उदनिर्वाह करण्यास मदत होणार आहे. यामुळे अपंग लाभार्थ्यांना कुटुंबांचे ओझे न होता स्वावलंबी होऊ लागले आहेत. दरवर्षी जिल्हा परिषद समाजकल्याण अपंग विभागाच्या वतीने बीज भांडवल योजनेंतर्गत निधी वाटप केला जातो. अपंगांना व्यवसाय करण्यास मदत मिळाली आहे.

Web Title: Naveed crippled self-supporting