शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड विभागात पावणेचार कोटींचे वाटप

By admin | Updated: August 24, 2014 01:15 IST

श्रीनिवास भोसले, नांदेड शासनाकडून देय असलेले ५०० कोटी महामंडळास मिळाले़ यातील २१० कोटी रूपये कामगार वेतन करारातील फरकाची रक्कम म्हणून वाटप करण्यात आली़

श्रीनिवास भोसले, नांदेडशासनाकडून देय असलेले ५०० कोटी महामंडळास मिळाले़ यातील २१० कोटी रूपये कामगार वेतन करारातील फरकाची रक्कम म्हणून वाटप करण्यात आली़ नांदेड विभागातील कर्मचाऱ्यांना ३ कोटी ७१ लाख २४ हजार रूपयांचे वाटप झाल्याची माहिती विभाग नियंत्रक बालासाहेब घुले यांनी दिली़ शासनाकडून महामंडळास देय असलेली ५०० कोटी रूपये ११ आॅगस्ट रोजी महामंडळास रोखीने प्राप्त झाले होती़ यानंतर महामंडळाचे चेअरमन आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत कामगारांची थकीत रक्कम गणेशोत्सवापूर्वी वाटप करण्याचा आग्रह महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंतराव ताटे यांनी धरला होता़ यानूसार चर्चा करून रक्कम वाटप करण्याची २० आॅगस्ट ही तारीख निश्चित करून विभागवार आणि आगारनिहाय रक्कम जमा करण्यात आली़ यानंतर प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतनातील फरकाची रक्कम जमा करण्यात आली आहे़ आठ दिवसानंतर गणपती बाप्पाचे आगमण होत असून यापूर्वीच एसटी कामगाराच्या वेतन करारातील फरकाचे २१० कोटी रूपये वाटप करण्यात आले़ नांदेड विभागात जवळपास पावणेचार कोटी रूपये वाटप केले जात आहेत़ यामध्ये नांदेड वर्कशॉप आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ४९ लाख ५६ हजार रूपये, नांदेड आगार- ७३ लाख ८७ हजार, देगलूर आगार- २९ लाख ३० हजार, किनवट- २७ लाख ९९ हजार, माहूर- १७ लाख १२ हजार, मुखेड- ४३ लाख, हदगाव- २९ लाख, कंधार- ४१ लाख, भोकर- ३० लाख ४९ हजार रूपये तर बिलोली आगारात ३० लाख असे एकूण ३ कोटी ७१ लाख २४ हजार रूपये एसटील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत़ यापूर्वी वेतन करारातील फरकाच्या रक्कमेचा पहिला टप्पा २५ जून २०१४ रोजी वाटप करण्यात आला होता़ नांदेड विभागामध्ये जवळपास ३ हजार २०० कर्मचारी असून त्यांच्या वेतन करारातील फरकाची रक्कम वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक घुले यांनी सांगितले़ गौरी आणि गणपती सणाच्या अगोेदर ही रक्कम मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे़ एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांची असलेली थकबाकी आता पूर्णपणे कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे़ २५ टक्क्याच्या मागणीवर इंटक ठाम़़़एसटी कामगार वेतन करार आणि एम़एस़ई़बी वेतन करारात मोठी तफावत असून एसटीचा करार आम्हाला मान्य नसून तो औद्योगिक कलह अधिनियम १९४७ मधील तरतुदीनुसार रद्द करून एमएसईबी प्रमाणे २५ टक्के पगार वाढीचा करार करण्यात यावा, या मागणीवर महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) ठाम असल्याची माहिती विभागीय सचिव पी़ आऱ इंगळे यांनी दिली़ एसटी कामगारांसाठी २०१२ ते २०१६ या कालावधीकरीता झालेल्या वेतन करारातील वाढ इंटकला मान्य नाही़ त्यामुळे सदरील कामगार करार त्वरीत रद्द करून २५ टक्के पगार वाढीचा करार करावा, असे इंगळे म्हणाले़