शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापनाविना मनपा

By admin | Updated: August 5, 2016 00:14 IST

लातूर : शहराची प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महानगरपालिकेत किमान पावसाळ्यात २४ तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित असणे अपेक्षित आहे़

लातूर : शहराची प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महानगरपालिकेत किमान पावसाळ्यात २४ तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित असणे अपेक्षित आहे़ मात्र लातूर मनपात असा कक्ष कार्यान्वित नाही़ गेल्या शनिवारी झालेल्या मोठ्या पावसात शहरातील अनेक नगरांतील घरामध्ये पाणी शिरले़ परंतु, मनपाला शहाणपण आले नाही़ ना आपत्ती व्यवस्थापन कक्ष ना नाले सफाई, अशी स्थिती आहे़गेल्या शनिवारी लातूर शहर व जिल्ह्यात मोठा पाऊस झाला़ नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहिले़ लातूर शहरातल्या नाल्यांची साफ सफाई न केल्यामुळे पाण्याचा निचरा होवू शकला पाणी़ परिणामी, गरूड चौक, हत्ते नगर, कस्तूरे गार्डन, सिद्धेश्वर चौक, बरकत नगर आदी परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले़ पाच वर्षांपूर्वी असाच मोठा पाऊस झाला होता़ त्यावेळी तर शहरातील सकल भागात असलेल्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते़ दोन-चार दिवसांसाठी त्या परिसरातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन करावे लागले होते़ हा पूर्वानुभव असताना मनपात अद्याप आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन झालेला नाही़ अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संयुक्त टीम तयार करून आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करता येवू शकतो़ मात्र मनपात असा कक्ष स्थापन झाला नाही़ अपुरे मनुष्यबळ, पैशाची कमतरता आदी कारणे सांगून, याकडे मनपा प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे़ रात्री-बेरात्री पाऊस झाला तर नागरिकांनी कोणाशी संपर्क साधावा, अशी सद्यस्थिती आहे़ गेल्या शनिवारी झालेल्या पावसामुळे गरूड चौकात एका माजी नगरसेविकेच्या घरात पाणी शिरले़ त्यांनी मनपा प्रशासनाकडे नाले सफाईची मागणी केली, परंतु, अद्याप सफाई करण्यात आलेली नाही़ काही भागात नाल्या सफाई न केल्यामुळे तर काही भागात नाल्याच नसल्यामुळे घरात पाणी शिरत आहे़ महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष नसल्यामुळे नागरिकांनी मदत कोणाकडे मागावी असा प्रश्न आहे़ सकल भागातील नाल्यांमध्ये गाळ साचला आहे़ दगड-गोट्यांचे प्रमाणही आहे़ त्याची दुरूस्ती केली जात नाही़ त्यामुळे नाल्या तुंबून पाणी घरात येत आहे़ शनिवारी झालेल्या एका मोठ्या पावसामुळे अनेक नगरांतील घरात पाणी घुसले होते़ तरीही प्रशासन थंड आहे़