शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांऐवजी अनुदानात दुसऱ्यांची नावे

By admin | Updated: June 20, 2014 00:44 IST

वडवणी: तालुक्यातील देवडी येथील भागात ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा व ८ अच्या उताऱ्याला नसतानाही त्यांची नावे गारपीटग्रस्त अनुदानाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली.

वडवणी: तालुक्यातील देवडी येथील भागात ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा व ८ अच्या उताऱ्याला नसतानाही त्यांची नावे गारपीटग्रस्त अनुदानाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याचा आरोप देवडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केला आहे.देवडी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तलाठी उबाळे यांनी ज्या शेतकऱ्यांची नावे देवडी शिवारातील सातबारा व ८ अच्या उताऱ्याला नसतानाही गारपीटग्रस्त अनुदानाच्या यादीत समाविष्ट करुन प्रत्यक्षात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. धनराज श्रीहरी देशमुख गट नं. ३४४, यादी क्र.३२ व रक्कम ९ हजार, रमाबाई श्रीहरी देशमुख गट नं. ९८, यादी क्र.६३ व रक्कम ६ हजार, गणेश दिगंबर देशमुख गट नं. २०५, यादी क्र.९४ व रक्कम १२ हजार, मंदा धनंजय देशमुख गट नं. ३३९, यादी क्र.१२७ व रक्कम १८ हजार व मनीषा गणेश देशमुख गट नं. ३३६, यादी क्र.१५८ व रक्कम ९ हजार या पाच व्यक्ती पिंपरखेडच्या रहिवासी आहेत. मात्र त्यांच्या नावसमोर दर्शविलेले गट नं. देवडी शिवारातील शेतकऱ्यांचे आहेत. त्याचा पुरावा म्हणून देवडी येथील गट क्रमांकाचा सातबारा जोडण्यात आला आहे. वरील व्यक्ती पिंपरखेड येथील रहिवाशी असून, त्यांचा पिंपरखेड येथील मतदान यादीचा पुरावाही जोडण्यात आला आहे. तसेच गट नं. ३६ हा मारुती देवस्थानाचा असून, या गट नं. ३६ मध्ये यादीतील १६९ ते २२१ या लोकांची नावे सातबारा व ८ अमध्ये कोठेही नावे नाहीत. मात्र त्यांना अनुदान देण्यात आले आहे. हे पाच व्यक्ती तलाठी व त्यांचे सहायक यांच्या कुटुंबातील नावे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. निवेदनावर विश्वास आगे, जावेदखाँ महेबूबखाँ पठाण, रामप्रसाद आगे, महादेव नाईकवाडे, विश्वनाथ झाटे आदींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)