शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नाळवंडीच्या महिला सरपंचाचे प्रेत आढळले विहिरीत

By admin | Updated: January 29, 2015 01:15 IST

डोंगरकिन्ही : पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील महिला सरपंच कविता सुभाष डोके (वय ४४) यांचे प्रेत बुधवारी गावाजळील विहिरीत आढळले. त्या रविवारपासून बेपत्ता होत्या

डोंगरकिन्ही : पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील महिला सरपंच कविता सुभाष डोके (वय ४४) यांचे प्रेत बुधवारी गावाजळील विहिरीत आढळले. त्या रविवारपासून बेपत्ता होत्या. त्यांचे प्रेत आढळल्याने तालुका हादरून गेला आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल उलटसुलट चर्चा असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांना कुठलेच धागेदोरे मिळाले नव्हते. शेती हेच उपजिविकेचे त्यांचे साधन होते. त्यांच्याकडे गुरे आहेत. कधी पती, कधी मुलगा कधी सून तर कधी त्या स्वत: गुरे चारण्यासाठी जात. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी त्या जनावरे चारण्यासाठी गावाजवळील शेतात गेल्या होत्या. मात्र, सायंकाळी त्या परतल्याच नाहीत़ त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला़ निराश होऊन नातेवाईकांनी अंमळनेर ठाणे गाठून बेपत्ताची नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांनीही शोध मोहीम राबविली; परंतु त्या मिळून आल्या नाहीत. नाळवंडी शिवारातीलच एका विहिरीत बुधवारी सायंकाळी सहा वाजता एका महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. हे प्रेत दुसऱ्या, तिसऱ्या कोणाचे नाही तर सरपंच कविता डोके यांचेच असल्याचे तपासात पुढे आले. दरम्यान, या विहिरीत उतरून दोन दिवसांपूर्वी तपासणी केली होती; पण काहीच मागमूस लागला नव्हता. बुधवारी याच विहिरीत त्यांचे प्रेत आढळले.पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी गावातील चुली पेटल्या नाहीत. त्यांच्यामागे पती, मुलगा, सून असा परिवार आहे. (वार्ताहर)कविता डोके या सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या़ गावाच्या विकासाची त्यांना सतत तळमळ होती. त्यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी गावातील अवैध धंदे बंद पाडले होते़ त्यामुळे गाव व्यसनमुक्त झाले होते. रस्ते, नळयोजना, पथदिवे, पांदणमुक्तीसाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता. बचत गटांमधून त्यांनी महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता.जानेवारी २०१३ मध्ये कविता डोके नाळवंडीच्या सरपंच झाल्या. त्यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. ४प्रजासत्ताक दिनी त्यांनी ‘बेटी बढाओ, बेटी पढाओ’ यासह बचतटांच्या महिलांसाठी ग्रामसभा बोलावली होती. ४प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्या बेपत्ता झाल्या. त्यामुळे ग्रामसेवकांच्या हस्तेच ध्वजारोहण झाले. ग्रामसभाही झाली नाही.