शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

माझी भूमिका ही लोकमान्यांना आदरांजली

By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST

औरंगाबाद : ‘मी पडद्यावर साकारलेली लोकमान्य टिळक यांची भूमिका म्हणजे त्यांच्या जीवित कार्याला वाहिलेली नम्र आदरांजली आहे

औरंगाबाद : ‘मी पडद्यावर साकारलेली लोकमान्य टिळक यांची भूमिका म्हणजे त्यांच्या जीवित कार्याला वाहिलेली नम्र आदरांजली आहे. हा चित्रपट पाहून आजच्या उच्चशिक्षित नवतरुणांमध्ये निर्माण झालेले डोळस देशप्रेम मला माझ्या कामाचे सार्थक झाल्याची भावना देते,’ या शब्दात चतुरस्र अभिनेता व रंगकर्मी सुबोध भावे याने ‘लोकमान्य’ चित्रपटाच्या निमित्ताने आपले मनोगत रसिकांपुढे मांडले.‘लोकमत’च्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त कविसंमेलनात ‘लोकमान्य’ चित्रपटाचे युवा दिग्दर्शक ओम राऊत व सुबोध भावे यांनी आवर्जून उपस्थिती लावत हा चित्रपट पाहण्याचे रसिकांना आवाहन केले. कवी अरुण म्हात्रे यांनी दोघांना बोलते करत त्यांचा चित्रप्रवास उलगडला. लोकमतचा प्रवास व ध्येय उलगडणारी एक चित्रफीत दाखविण्यात आली. ‘लोकमान्य’ मधील काही क्षणचित्रेही चित्रफितीतून रसिकांनी पाहिली.वृत्तपत्राला ‘लोकमत’ हे नाव टिळकांनीच सुचवले असल्याने टिळकांशी लोकमतचा जुना ॠणानुबंध आहे. लोकमान्य टिळकांच्या भूमिकेची नस कशी सापडली या प्रश्नाचे उत्तर देताना भावे म्हणाले, ‘माझे व्यक्तिमत्त्व गोंडस, हळवे आणि विशेषत: डोळे रोमँटिक असल्याने अनेकांनी मी लोकमान्य साकारण्यासाठी मुळीच योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. मग मी भूमिकेचा रियाज म्हणून मुख्यत: लोकमान्य टिळकांची करारी नजर पाहत राहिलो. त्यांचे फोटो, पुतळे अशा सर्वांवर मी लक्ष केंद्रित केले. या नजरेत मला त्यांचा आत्मा गवसला.’ बालपणापासून केलेली नाटके महाविद्यालयातील एकांकिका यातून मी घडत गेलो. एका नाटकात केलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेने मला पहिल्यांदा आत्मविश्वास दिला. त्या अर्थाने औरंगजेब माझे प्रेरणास्थानच आहे, अशीही भावना त्याने मांडली. हा चित्रपट का बनवावासा वाटला याचे उत्तर देताना राऊत म्हणाले, ‘आजच्या पिढीला खोट्या लढाया करणारे सुपरमॅन, बॅटमॅन माहीत आहेत; पण स्वातंत्र्यासाठी अनेक अवघड लढाया यशस्वीपणे जिंकणारे टिळक आमच्यापर्यंत नीट पोहोचले नाहीत. ते कळावेत, त्यातून काही प्रेरणा मिळावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. टिळकांनी तरुणांना सोबत घेऊन स्वराज्य मिळविले. आजच्या तरुणांनी त्याचे सुराज्य घडवावे.’ स्त्री भूमिका करणारे नाजूक बालगंधर्व व कणखर, बाणेदार टिळक या विरोधी भूमिका सुबोधने लीलया केल्या. कारण तो ‘अ‍ॅक्टर’ नसून ‘रिअ‍ॅक्टर’ आहे. व्यक्तिरेखेचा अंश स्वत:मध्ये भिनवत तो भूमिका जगतो, असेही राऊत म्हणाले. मुक्तसंवादाचा शेवट करताना सुबोधने सुधीर मोघे व अशोक नायगावकर यांच्या टिळकांवरील रचनांचे अभिवाचन केले.