शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामन, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
2
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
3
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
4
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
5
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
6
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
7
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
8
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
9
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
10
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
11
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
12
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
13
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
14
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
15
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
16
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
17
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
18
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
19
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
20
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न

माझ्या आधी माझे शहर म्हणजे ‘औरंगाबाद फर्स्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 19:03 IST

नागरिकांच्या सहभागातून प्रश्न सोडविण्यासाठी उभी राहणार व्यापक चळवळ

ठळक मुद्देशहरातील विविध प्रश्नांवर नागरिकांचा एक दबाव गट स्थापन व्हावा

औरंगाबाद : शहरातील विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी, तसेच हे प्रश्न सोडविण्यामध्ये नागरिकांचा सहभाग असावा या दृष्टीने ‘मराठवाडा एन्व्हायर्नमेंटल केअर क्लस्टर’ याअंतर्गत ‘औरंगाबाद फर्स्ट’ ही संस्था काही वर्षांपासून काम करीत असून, आगामी काळात नव्याने रस्ते, वृक्षारोपण, सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्वच्छ आणि हरित औरंगाबाद, वाहतूक शिस्त आणि सुरक्षा, महापालिकेच्या खुल्या जागा या मुद्यांवर ही संस्था काम करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उद्योजक मानसिंग पवार यांनी बुधवारी दिली. 

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला भेट दिली. यावेळी झालेल्या चर्चेत मानसिंग पवार यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांपासून ‘औरंगाबाद फर्स्ट’ ही संस्था कार्यरत आहे. संस्थेने काही प्रकल्पही मार्गी लावले आहेत. वाळूज औद्योगिक वसाहतीत वृक्षारोपण, औद्योगिक वसाहतींमध्ये स्वच्छता अभियान, मलनिस्सारण प्रकल्प आदी प्रकल्प राबविले आहेत. औरंगाबाद शहरातील विविध प्रश्नांवर नागरिकांचा एक दबाव गट स्थापन व्हावा या हेतूने आणि हे प्रश्न सोडविण्यामध्ये नागरिकांचा सहभागही असावा. नागरिकांच्या सहभागातून आपलेच प्रश्न सोडविण्यासाठी एक व्यापक चळवळ उभी राहावी, हा यामागचा हेतू आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या मागण्यांची सनदही देण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याबरोबर नागरिकांची जबाबदारी काय असते, याचीही सनद आम्ही मांडणार आहोत. शहरातील वाहतुकीच्या मुद्यावर आम्ही जगजागृतीपर कार्यक्रम घेणार आहोत. शहरात सुमारे ३७ हजार रिक्षाचालक आहेत. येत्या काही दिवसांत रिक्षाचालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहितीही मानसिंग पवार यांनी दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र कोंडेकर, कोषाध्यक्ष अनिल माळी, रमेश नागपाल, विवेक भोसले, समन्वयक हेमंत लांडगे, निखिल भालेराव, अभिजित हिरप उपस्थित होते. 

आमच्यासोबत विविध क्षेत्रांतील लोकयावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष राम भोगले म्हणाले की, समाजाच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन काही केले तर खूप काही होऊ शकते. यादृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करीत आहोत. आमच्यासोबत डॉक्टर, वकील, प्राध्यापक आदी मंडळी आहेत. यापूर्वी आम्ही स्वच्छता, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेतले आहेत. नव्याने शहरासमोरील काही समस्यांबाबत काम करणार आहोत. 

टॉप शहरांमध्ये समावेश व्हावायावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष रिषी बागला म्हणाले की, औरंगाबाद शहर सध्या देशात २०० व्या क्रमांकापेक्षाही खाली आहे. इंदूर, सुरत ही शहरे पूर्वी औरंगाबादपेक्षाही अस्वच्छ होती. आता ती देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत. औरंगाबाद शहराचादेखील २०२५ पर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये समावेश व्हावा, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी औरंगाबाद फर्स्ट ही संस्था काम करणार आहे. या शहरात बाहेरून खूप लोक आले. त्यांना या शहराने खूप काही दिले. आपलेही या शहरासाठी काही देणे लागते या भावनेतून या शहराला एका उंचीवर नेण्याची गरज आहे. माझ्याआधी माझे शहर म्हणजे ‘औरंगाबाद फर्स्ट’ अशी संकल्पना आहे. 

या मुद्यांवर संस्था करणार काम- शहरातील पार्किंगची समस्या- बीओटीवरील प्रकल्प- रस्ते सुशोभीकरण- सार्वजनिक शौचालये- पाण्याचे नियोजन- स्मार्ट वॉर्ड, स्मार्ट नगरसेवक- मनपा शाळांचे सामाजिक लेखापरीक्षण- याशिवाय पर्यावरण, पाणी, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंबंधी माहितीचे संकलन केले जाणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका