शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालये बनली संग्रहालये

By admin | Updated: January 30, 2015 00:51 IST

व्यंकटेश वैष्णव / राजेश खराडे , बीड ग्रंथालयांकडे फिरकणारी पावले दिवसेंदिवस विरळ होत आहेत. चूक पालकांची, महाविद्यालयांची की, प्राध्यापकांची याचा खल घालण्यापेक्षा वाचन संस्कृतीला

व्यंकटेश वैष्णव / राजेश खराडे , बीडग्रंथालयांकडे फिरकणारी पावले दिवसेंदिवस विरळ होत आहेत. चूक पालकांची, महाविद्यालयांची की, प्राध्यापकांची याचा खल घालण्यापेक्षा वाचन संस्कृतीला तडा बसतोय हे भयान वास्तव समोर येत आहे. महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांपैकी केवळ १९ विद्यार्थी अभ्यासक्रमांचे पुस्तके आठ दिवसाला ने-आण करतात, असे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. महाविद्यालयांकडून विद्यार्थी व प्राध्यापकांना ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. मात्र त्या पुस्तकांना अनेक महिन्यांपासून हाताळले नसल्याने वाळव्या लागण्याची वेळ जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील ग्रंथपालांवर आली असल्याचे नाव न छापन्याच्या अटीवर महाविद्यालयांच्या ग्रंथपालांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांने नेलेले पुस्तक सहा-सहा महिने विद्यार्थी परत आणून देत नसल्याचे वास्तव देखील पुढे आले. मोठ-मोठ्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी हजारो पुस्तके व वाचनासाठी हॉल उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र ते ग्रंथालयांचे हॉल रिकामे असल्याचे पहावयास मिळते.गुरूजी तुम्ही पण...विद्यार्थी तर ग्रंथालयांकडे फिरकत नाहीतच, परंतु काही प्राध्यापक, शिक्षकांना याबद्दल फारसी आत्मीयता वाटत नाही. कारण काही प्राध्यापकांच्या नावावर मागील सात महिन्यात एकही पुस्तक नेल्याची नोंद नसल्याचे भयान वास्तव समोर आले आहे. दंडही वसूल नाहीविद्यार्थ्यांने ग्रंथालयातून नेलेले पुस्तक आठ दिवसाला परत करून दुसरे घेवून जावे. असा नियम ग्रंथालयांकडून विद्यार्थ्यांना लावला जातो. मात्र विद्यार्थी एकदा पुस्तक घेवून गेले की, तीन ते सहा महिने ग्रंथालयांकडे फिरकत नाहीत. यामुळे महाविद्यालयाने वेळेत पुस्तके परत न करणाऱ्या विद्यार्थ्यांना दंड आकारला जातो. मात्र विद्यार्थीच ग्रंथालयांकडे फिरकत नसल्याचे ग्रंथपालांनी सांगितले.जिल्ह्यात ११६ महाविद्यालयेजिल्ह्यात एकूण ११६ च्या जवळपास उच्च शिक्षण देणारे महाविद्यालये आहेत. यामध्ये १९ महाविद्यालये बीड शहरात आहेत. तर ग्रामीण भागात ९७ च्या जवळपास महाविद्यालयांमधून शिक्षण दिले जाते.प्राचार्यांची खंत वर्षाकाठी ग्रंथालयातील पुस्तकांच्या संख्येत शेकडोंनी तर प्राध्यापकांच्या पगारीत हजारोंनी वाढ होत आहे. प्राध्यापकांनी ग्रथांलयातील पुस्तकांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना सक्षमीकरणासह शिक्षण देणे महत्वाचे आहे. जिथे प्राध्यापकच ग्रंथालयाकडे फिरकत नाहीत तिथे विद्यार्थ्यांचे काय? असे नाव न छापण्याच्या अटीवर एका प्राचार्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.महाविद्यालयातील ग्रंथालयात शालेय आभ्यासक्रमा बरोबर अवांतर वाचनासाठी लाखोच्या संख्येने पुस्तके उपलब्ध आहेत. तर वर्षाकाठी यामध्ये हजारोंनी पुस्तकांची भर पडते. मात्र ज्यांच्यासाठी हा ग्रंथांचा खटाटोप केला जातो तेच विद्यार्थी ग्रंथालयांकडे फिरकतही नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैचारीक पातळीला मर्यादा पडते़विद्यार्थी तासन-तास व्हॉटस्अ‍ॅप, ट्टिवीटर बसून चॅटींग करण्यात मग्न असता. आधुनिकीकरणाला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र वैचारीक पातळी उंचविण्यासाठी व कुठल्याही विषयांची माहिती घेण्यासाठी वाचना शिवाय पर्याय नाही. पन्नास विद्यार्थी बसण्याची क्षमता असलेल्या दालनात बोटावर मोजण्या इतकेच विद्यार्थी ग्रंथालयातील वाचन कक्षात गुरूवारी आढळून आहे. काही विद्यार्थी मात्र मोबाईलवरून चॅटींग करत बसले असल्याचे पहावयास मिळाले.तुमच्या महाविद्यालयातील ग्रंथालयात किती हजार पुस्तके आहेत असा प्रश्न विचारला असता. शंभर पैकी ६० टक्के ग्रंथपालांनी दहा हजार ते एक लाख पर्यंतचे पुस्तके ग्रंथालयात असल्याचे ग्रंथपालांनी सांगितले तर पाच हजार पुस्तके ग्रंथालयात असल्याचे चाळीस टक्के ग्रंथपालांनी सांगितले.