शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचारी कामावर परतले

By admin | Updated: July 25, 2014 00:30 IST

जालना : गेल्या आठ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेलेले पालिका कर्मचारी गुरुवारी कामावर पुन्हा परतले.

जालना : गेल्या आठ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेलेले पालिका कर्मचारी गुरुवारी कामावर पुन्हा परतले.वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी नगर पालिकांचे कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत संपावर गेले. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मंजूर झाल्या शिवाय संप मागे घेणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली. परिणामी हा संप चिघळणार अशी चिन्हे दिसू लागली. विशेषत: पालिके अंतर्गत सर्वच संघटनांनी एकत्रितपणे संप केल्यानंतर आठ दिवस पालिकेचे कामकाज पूर्णत: कोलमडून गेले. पावसाळ्याच्या तोंडावरच साफ सफाईची कामे पूर्णत: ठप्प झाली. त्यामुळे कचराकुंड्यांवर कचऱ्याचे ठिक ठिकाणी ढीग साचले. तसेच नाल्याही पूर्णत: तुंबल्या. गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरले. संपूर्ण जालना शहरात स्वच्छतेसह अन्य नागरी सेवा कोलमडल्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झाले होते. जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या पालिकांमधूनही कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. या स्थितीत जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा. व नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होत होती. अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत हस्तक्षेप करीत, चर्चा करीत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे संघटनांनी आपला संप मागे घेतला. दरम्यान, शहरातील आठ दिवसांपासून ठप्प असलेली कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. यात प्रामुख्याने पाणी पुरवठा व स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पालिका कार्यालय गजबजलेगेल्या आठ दिवसांपासून पालिकेच्या सर्व विभागात कमालीचा शुकशुकाट होता. स्वच्छता विभागासह अन्य विभागाची कामे पूर्णत: ठप्प होती. कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावरच ठाण मांडून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच पालिका कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही कामे झाली नाहीत. गुरुवारी कर्मचारी परतल्यानंतर सर्व विभाग गजबजून गेले. नागरिकांनीही कामांसाठी गर्दी केली.