शहरं
Join us  
Trending Stories
1
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
4
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
7
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
8
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
9
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
10
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
11
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
12
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
13
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
15
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
16
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
17
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
20
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळा; विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक जास्त

By admin | Updated: May 27, 2014 00:59 IST

जालना : नगरपालिकेअंतर्गत २१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या चार-पाच वर्षांमध्ये निम्म्याहून कमी झाली.

जालना : नगरपालिकेअंतर्गत २१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या चार-पाच वर्षांमध्ये निम्म्याहून कमी झाली. मात्र शिक्षक संख्या पूर्वीचीच असल्याने शिक्षक जास्त आणि विद्यार्थी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे ३० शिक्षक जादा असल्याने त्यांना जिल्हा परिषदेकडे वर्ग करावे, अशी मागणी होत आहे. या शाळांमध्ये १२५ शिक्षक व ५ शिपाई कार्यरत आहे. २००९ पासून या पदांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याउलट शिक्षणाधिकार्‍यांसह मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे शाळांचीही दुरवस्था झालेली असून पुरेशा सुविधा नसल्याने विद्यार्थी खाजगी शाळांकडे वळत आहेत. याबाबत स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे यांनी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सन २००९ ला ४८०० विद्यार्थी शिकत होते. त्याचे प्रमाण कमी कमी होत आता २००० पर्यंत आली आहे. विद्यार्थी टक्का वाढीसाठी नगर पालिकेच्यावतीने कोणतेही प्रयत्न केले जात नाही. समाजात अत्यंत दुर्लक्षित वर्गाची मुलेच येथे शिक्षण घेताना दिसतात. शाळेतील शिक्षक वर्गास ८० टक्के रक्कम राज्य शासन पगार देते व २० टक्के नगर पालिकेचा वाटा असतो. त्या २० टक्के पगाराच्या मागणीकरिता शिक्षक नेहमीच आंदोलन करतात. शाळेच्या अशा व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणही वाढले आहे. शिक्षण उपसंचालकांनी या विभागाला अनेक वेळा सूचना देऊनही त्याचा काहीच परिणाम न झाल्याचे दिसते. जिल्हा परिषदेप्रमाणे शाळा व्यवस्थापन कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांची शाळेबद्दची असणारी गोडी वाढवावी, तसेच शाळा सुविधेबाबत संबंधितांनी लक्ष द्यावी अशी मागणी चिन्नादोरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी) पालकांकडून अपेक्षा नगरपालिका शाळांची दुरवस्था असल्याने या शाळांची स्थिती चांगली करून तेथे विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी किमान अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे. नगरपालिकेने त्यासाठी वाढीव निधीची तरतूद करावी, अशीही मागणी केली जात आहे.