महानगरपालिकेचे कर्मचारी सातच्या आत घरात!

By Admin | Updated: August 28, 2014 00:21 IST2014-08-28T00:06:52+5:302014-08-28T00:21:54+5:30

औरंगाबाद : महापालिकेत काल २६ रोजी सायंकाळी अचानक सुरक्षा विभागाने सायरन वाजवून पालिकेतील सर्व दालने सहा वाजेपर्यंत बंद करण्याचे फर्मान सोडले.

Municipal corporation house within seven years! | महानगरपालिकेचे कर्मचारी सातच्या आत घरात!

महानगरपालिकेचे कर्मचारी सातच्या आत घरात!

औरंगाबाद : महापालिकेत काल २६ रोजी सायंकाळी अचानक सुरक्षा विभागाने सायरन वाजवून पालिकेतील सर्व दालने सहा वाजेपर्यंत बंद करण्याचे फर्मान सोडले. दालने बंद करून त्याच्या चाव्या सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतल्या. हा आदेश कालच्या पुरताच होता की, त्याचे अनुपालन रोज केले जाणार आहे. याबाबत प्रशासनाकडून कुणीही बोलण्यास तयार नाही. मात्र, त्या आदेशाचे तंतोतंत पालन झाले तर पालिकेचे कर्मचारी सातच्या आत घरी जातील.
सर्व विभागप्रमुखांना यापुढे सहा वाजेनंतर कार्यालय बंद करण्याचे तोंडी आदेश जारी करण्यात आल्यामुळे पालिकेतील कर्मचारी यापुढे सातच्या आत घरी जाणार आहेत. पालिकेतील अनेक दालने ही सायंकाळी सहा वाजेनंतर सुरू असतात. विशेष म्हणजे लेखा विभागात सहा वाजेनंतरच मैफल जमते. कंत्राटदारांचे धनादेश देण्याचा व्यवहारही सहाच्या नंतरच सुरू होतो. काही विभागप्रमुख अभ्यागतांच्या वेळेत पालिकेत येत नाहीत. ३ ते ५ या वेळेत नागरिक निघून जातात. त्यानंतर विभागप्रमुख पालिकेत येतात व दिवसभरातील कामकाज पूर्ण करतात. पालिकेतील धनादेश पळवापळवीचे प्रकरण ताजेच आहे. सहानंतरच ती घटना घडली होती. यासारख्या घटना होऊ नयेत, तसेच अधिकारी, कर्मचारीही वेळेत पालिकेबाहेर पडावेत, या हेतूनेच प्रशासनाने अलिखित आदेश जारी केले आहेत. दरम्यान, आयुक्त डॉ.कांबळे यांनी असे कुठलेही आदेश काढले नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Municipal corporation house within seven years!