शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला लागले नोकर भरतीचे डोहाळे

By admin | Updated: November 16, 2015 00:41 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या महानगरपालिकेस आता नोकर भरतीचे डोहाळे लागले आहेत. दोन वर्षांपूर्वीच महानगरपालिका ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात आली.

सुनील कच्छवे , औरंगाबादआर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या महानगरपालिकेस आता नोकर भरतीचे डोहाळे लागले आहेत. दोन वर्षांपूर्वीच महानगरपालिका ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात आली. त्यामुळे मनपा प्रशासनाने पदांचा नवीन आकृतिबंध तयार केला असून, तो लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. मनपात मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करून हित साधण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. महानगरपालिकेत याआधी १९९१ साली नोकर भरती झाली होती. त्यानंतर अपवाद वगळता नवीन भरती झालेली नाही. दुसरीकडे शहराची लोकसंख्या कित्येक पट्टींनी वाढली. मनपाच्या हद्दीतही वाढ झाली. त्यामुळे पालिकेवरील कामाचा ताण वाढला आहे. शिवाय विविध कारणांनी अनेक पदे रिक्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या दर्जात सुधारणा झाली असून, आता मनपा ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात आली आहे. त्यामुळे ‘क’ वर्गाचा आकृतिबंध लागू होणार आहे. राज्यातील ‘क’ वर्गातील मनपात औरंगाबाद मनपापेक्षा किती तरी अधिक पदे आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने आता पदांचा नवीन आकृतिबंध तयार केला आहे. हे काम दोन महिन्यांपासून सुरू होते. आस्थापना अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी हा आकृतिबंध नुकताच तयार करून आयुक्तांना सादर केला आहे. आता मनपा आयुक्तांकडून हा आकृतिबंध मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.