शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

गाळ घोटाळा विधानसभेत

By admin | Updated: July 8, 2016 23:50 IST

औरंगाबाद : हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री निधीतून दोन कोटी रुपयांचा निधी मनपाला दिला होता.

औरंगाबाद : हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री निधीतून दोन कोटी रुपयांचा निधी मनपाला दिला होता. गाळ काढण्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे अलीकडेच ‘लोकमत’ने उघडकीस आणले. मनपाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीत काही अधिकारी दोषी असल्याचे निष्पन्न झाले. प्रशासनाने दोषींना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. आयुक्तांनी अद्याप कारवाईचा बडगा उगारलेला नाही. याच दरम्यान, गाळातील भ्रष्टाचारावर विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने प्रशासन चांगलेच भेदरले आहे.काँग्रेस आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद महापालिकेला मुख्यमंत्री साह्यता निधीतून २ कोटी रुपयांचा निधी दिला. या निधीतून हर्सूल तलावातील गाळ काढावा असे शासनाने नमूद केले होते. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सुरुवातीला गाळ काढण्यासाठी विविध कारणे दिली. यंदा विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी पुढाकार घेऊन गाळ काढायला भाग पाडले. मनपाने या कामाची निविदा प्रकिया अगोदरच केली होती. त्यामुळे विद्यमान आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आणि विभागीय आयुक्तांनी निविदेच्या दराची चौकशीच केली नाही. कंत्राटदाराने अवघ्या पंधरा दिवसांमध्ये ५० ते ५५ हजार क्युबिक मीटर गाळ उचलला. त्यानंतर दोन कोटी रुपये संपले म्हणून त्याने ऐन उन्हाळ्यात काम बंद केले. त्याच्या या प्रवृत्तीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘लोकमत’ने निविदा प्रक्रियेच्या खोलात जाऊन माहिती घेतली असता विदारक सत्य समोर आले. बाजारात अवघ्या २२ ते २९ रुपये दराने एक क्युबिक मीटर गाळ काढण्यात येतो. मनपाने तब्बल ३६० रुपये दराने कंत्राटदाराला हे काम दिले होते. तलावातील एक टक्काच गाळ कंत्राटदाराने काढला. नगरसेवक राजू शिंदे यांनी आपल्या खिशातील पैसे खर्च करून एका पोकलेनने तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली. कंत्राटदाराने जेवढा गाळ उचलला होता त्यापेक्षा कितीतरी जास्त गाळ या पोकलेनच्या साह्याने काढण्यात आला.