औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत रविवारी महावितरण अ संघाने महसूल विभाग जालनावर २२ धावांनी, महसूल व वन विभागाने फोर्बस संघावर ४८ धावांनी, तर वैद्यकीय प्रतिनिधी अ संघाने महावितरण ब संघावर ९ धावांनी मात केली. सौरभ थोरातचे झंझावाती शतक हे आज झालेल्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. स्वप्नील चव्हाण आणि महेश जाधव हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.पहिल्या सामन्यात महावितरण अ संघाने २० षटकांत ७ बाद १५२ धावा केल्या. त्यांच्याकडून स्वप्नील चव्हाणने ४१ चेंडूंत ३ षटकारांसह ६१, आदित्य राजहंसने २० व इनायत अलीने १९ धावा केल्या. महसूल विभाग जालनातर्फे विठ्ठल गाडेकरने २, तर विजय नवगिरे, राजीव नंदकर, आशिष सूर्यवंशी, ओमकार मांजरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जालना संघ ८ बाद १३० धावा करू शकला. त्यांच्याकडून ओमकार मांजरेने ३८ धावा केल्या. महावितरणकडून पवन सूर्यवंशीने ४० धावांत ४ गडी बाद केले. सय्यद इनायत अली, कैलास शेळके, स्वप्नील चव्हाण, राहुल शर्मा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसऱ्या सामन्यात औरंगाबादच्या महसूल व विन विभागाने ६ बाद १९९ धावा केल्या. त्यांच्याकडून शेखर शिंदेने २ षटकार व ६ चौकारांसह ५५, मधुकर साळवेने २८ व लईक अन्सारीने २२ धावा केल्या. फोर्बसकडून कृष्णा राठोड व रोहित कुलकर्णी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात फोर्बसने २ बाद १५१ धावा केल्या त्यांच्याकडून सौरभ थोरातने ६६ चेंडूंतच ४ षटकार व १५ चौकारांसह १०५ धावांची झुंजार खेळी केली. नीलेश देवराजने १७ धावा केल्या. महसूल व वन विभागाकडून शेखर शिंदेने १ गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी अ संघने ९ बाद १५१ धावा केल्या. त्यांच्याकडून महेश जाधवने ३ चौकारांसह ३४, अनिकेत जाधवने ३१, राहुल भालेरावने २६ व योगेश एडकेने २० धावा केल्या. महावितरण ब कडून संजय बनकरने २५ धावांत ६ गडी बाद केले. अनिकेत काळे, पांडुरंग धांडे व जोगिंदर तुसमकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महावितरण ब संघ २० षटकांत ९ बाद १४२ धावाच करू शकला. त्यांच्याकडून जोगिंदर तुसमकरने ५ चौकारांसह ५४, बाळासाहेब मगरने ३४ व पांडुरंग धांडेने २४ धावा केल्या. महावितरणकडून विनोद शाहूराजेने २५ धावांत ३ व सतीश गोरेने २ गडी बाद केले. अनिकेत जाधव, राहुल भालेराव, महेश जाधव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
महावितरण, महसूल, वैद्यकीय प्रतिनिधी संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:01 IST
एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत रविवारी महावितरण अ संघाने महसूल विभाग जालनावर २२ धावांनी, महसूल व वन विभागाने फोर्बस संघावर ४८ धावांनी, तर वैद्यकीय प्रतिनिधी अ संघाने महावितरण ब संघावर ९ धावांनी मात केली. सौरभ थोरातचे झंझावाती शतक हे आज झालेल्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. स्वप्नील चव्हाण आणि महेश जाधव हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
महावितरण, महसूल, वैद्यकीय प्रतिनिधी संघ विजयी
ठळक मुद्देसौरभ थोरातचे झुंजार शतक : स्वप्नील, महेश चमकले