एमएसईबी, ग्रामीण पोलीस विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:48 AM2017-12-07T00:48:07+5:302017-12-07T00:49:15+5:30

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरूअसलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत एमएसईबी संघाने पीडब्ल्यूडी संघावर, तर ग्रामीण पोलीसने आयुर्विमा संघावर मात केली. इनायत अली सय्यद याचा अष्टपैलू खेळ, शैलीदार फलंदाज स्वप्नील चव्हाण आणि अजय काळे यांची दणकेबाज अर्धशतके ही आज झालेल्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.

MSEB, rural police won | एमएसईबी, ग्रामीण पोलीस विजयी

एमएसईबी, ग्रामीण पोलीस विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देस्वप्नील, इनायत, अजय चमकले


औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरूअसलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत एमएसईबी संघाने पीडब्ल्यूडी संघावर, तर ग्रामीण पोलीसने आयुर्विमा संघावर मात केली. इनायत अली सय्यद याचा अष्टपैलू खेळ, शैलीदार फलंदाज स्वप्नील चव्हाण आणि अजय काळे यांची दणकेबाज अर्धशतके ही आज झालेल्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
पहिल्या सामन्यात एमएसईबी संघाने इनायत सय्यदच्या ७ चौकार व एका षटकारासह ५0 चेंडूंत ५७ आणि स्वप्नील चव्हाणने अवघ्या २३ चेंडूंतच ४ षटकार व २ चौकारांसह केलेल्या वादळी ५१ धावांची खेळीच्या बळावर ५ बाद १७७ धावा ठोकल्या. सचिन पाटीलने ३७ चेंडूंत ८ चौकारांसह ४३ धावांचे योगदान दिले. पीडबल्यूडीकडून नीरज शिमरे याने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पीडब्ल्यूडी संघ १४४ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून नीरज शिमरे याने ४४ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ५४ व योगेश राठी याने २३ धावांचे योगदान दिले. एमएसईबीकडून इनायतअली सय्यद याने २२ धावांत ४ गडी बाद केले. पांडुरंग धांडेने ३, तर सचिन पाटीलने १ गडी बाद केला.
दुसºया सामन्यात आयुर्विमा संघ ८८ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अभिजित भगतने ३२ व विल्यम लालसरेने २५ धावा केल्या. ग्रामीण पोलीसकडून संदीप जाधवने ३ व अजय काळे व विकास नगरकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ग्रामीण पोलीसने विजयी लक्ष्य ९.१ षटकांत १ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून अजय कोने ३२ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद ५३, वसीम खानने २७ धावा केल्या. आयुर्विमा संघाकडून संजय भुसारे याने १ गडी बाद केला.

Web Title: MSEB, rural police won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.