शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात किसान सभेचे आंदोलन

By admin | Updated: May 17, 2016 00:09 IST

परभणी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १६ मे पासून गाव पातळीवर उपोषण आंदोलन सुरू केले असून सोमवारी जिल्ह्यातील २० गावांत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

परभणी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १६ मे पासून गाव पातळीवर उपोषण आंदोलन सुरू केले असून सोमवारी जिल्ह्यातील २० गावांत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले असून, त्यांना प्रशासनाने मदत करण्याऐवजी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संपूर्ण कर्ज माफ करा, शेती व्यवसायासाठी बिनव्याजी एकरी ५० हजार रुपये भांडवल द्या, ज्या खाजगी बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत, ती गावे राष्ट्रीयकृत बँकांना दत्तक द्या, शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मोफत बी बियाणे, खत, औषधी द्या, पीक विम्याची रक्कम तत्काळ अदा करा आदी मागण्यांसाठी १६ मेपासून शेतकऱ्यांचे जिल्ह्यातील प्रत्येक गावात उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली मुंजाभाऊ कदम, सुदाम कदम, मधुकर कदम, उत्तमराव खिल्लारे, तुकाराम खिल्लारे, माणिक सुरवसे, साहेबराव वाघे या शेतकऱ्यांनी गावात आंदोलन केले, बोरवंड बु. येथे दिनेश खवले, मंचक यादव, कचरुबा बिंडे, रोहिदास यादव, परसराम खवले, बाबासाहेब खवले, गिन्यादेव लोखंडे, रुस्तुम खवले, राजाभाऊ खवले, सुरपिंपरी- येथे राजेभाऊ राठोड, भगवान पौळ, वसंत पवार, अंकुश धुमाळ, नाना बाबर, पिंपळगाव ठोंबरे- उद्धव ढगे, ज्ञानोबा ढगे, नारायण चेअरमन, लक्ष्मण ठोंबरे, उजळंबा- अशोक कांबळे, सखाराम धोत्रे, शिवाजी आगरकर, बाळासाहेब कांबळे, गंगाधर साखरे, ताडपांगरी- रामेश्वर वैरागड, सुदाम वैरागड, कैलासवाडी- रामराव कोळेकर, सोपान जोरवर, दत्तराव घुन्नर, विलास कोळेकर, इंदेवाडी- सुरेश कच्छवे, गणेश कच्छवे यांच्यासह २० गावांतील शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात उपोषण आंदोलन केले. चौकशीसाठी उपोषण परभणी : तालुक्यातील टाकळी बोबडे गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली आहे. परंतु, गावात एकही जलयुक्तचे काम पूर्ण करण्यात आले नाही. गावाजवळ एकही बंधारा बांधण्यात आला नाही. त्यामुळे पाणीपातळी खालावली आहे. जलसंपदा विभागाकडून एक मशीन देण्यात आली आहे. मात्र चार महिन्यांत केवळ २०० मीटर काम करण्यात आले आहे. निधी उपलब्ध करून द्यावा तसेच कामे वेळेत का पूर्ण झाली नाही, याची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात आले. नामदेव बोबडे, उद्धव बोबडे, लक्ष्मण बोबडे, बापूराव बोबडे, त्र्यंबक बोबडे, शिवाजी बोबडे, संजय दीपके, मधुकर बोबडे, रामभाऊ गाडे, विठ्ठल दिपके आदींनी सहभाग नोंदविला.