शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
4
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
7
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
8
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
9
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
10
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
11
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
12
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
13
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
14
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
15
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
16
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
17
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
18
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
19
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
20
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आई हाच माझा गुरू

By admin | Updated: July 12, 2014 01:04 IST

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, दरवर्षी गुरुपौर्णिमा जवळ आली की, बालपणीचे दिवस मला आठवतात. एकामागून एक बालपणीचे ते सर्व प्रसंग आठवायला लागतात.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, दरवर्षी गुरुपौर्णिमा जवळ आली की, बालपणीचे दिवस मला आठवतात. एकामागून एक बालपणीचे ते सर्व प्रसंग आठवायला लागतात. आठवणी या रेल्वेच्या डब्यासारख्या असतात. एकामागे दुसरा डबा जोडावा तसे आठवणीचे प्रसंग जोडले जातात. जिच्या पोटी मी जन्म घेतला ती माझी आई, हीच माझा पहिला गुरू. कारण घरात अठराविश्व दारिद्र्य आणि दोन वेळच्या भाकरीची वानवा. अशा काळात तिच्यामध्ये मला आत्मा आणि ईश्वराचा साक्षात्कार झाला. ती माझी आई... यशोदा तिचे नाव. बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश तिने मला शालेय वयातच दिला. वडील आनंदा यांचेही पाठबळ मोलाचे. शाळेत शिकत असतानाच केळुस्कर गुरुजींचेभगवान गौतम बुद्धांचे चरित्र्य वाचायला मिळाले. बुद्धांचा शांतीचा संदेश मनावर कोरला गेला. जगभर सगळीकडे फिरलो. कधी शिक्षणासाठी, कधी संशोधनासाठी. अनेकदा पर्यटनासाठीसुद्धा; परंतु हवाई भराऱ्या घेत असतानाही माझे पाय नेहमी जमिनीवरच राहिले. माती अन् मातीशी असलेले नाते जोडत असताना चाळ शिरंभे (ता. कराड, जि. सातारा) येथील जि. प. शाळेचा विद्यार्थी आणि आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू या अर्धशतकाच्या वाटचालीत अनेक गुरुजी आणि मित्र भेटले. कराडच्या यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये बी. एस्सी केले. तिथेच मला एन.जे. पवार हा मित्र भेटला. जो आज शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू आहे. कॉलेजात सोबत असताना दोघेही पुणे विद्यापीठात प्रोफेसर झालो. दुसऱ्याकडूनही अनेक गोष्टी शिकलो. वर्गातला मित्र, विदेशातील संशोधक आणि आता विद्यापीठातले सहकारी या प्रत्येकाकडून काही ना काही शिकलो.