धनगर समाजाचा आरक्षण अंमलबजावणीसाठी मोर्चा

By Admin | Updated: July 31, 2014 00:45 IST2014-07-31T00:03:40+5:302014-07-31T00:45:56+5:30

घनसावंगी : अनुसूचित जाती आरक्षण अंमलबजावणीसाठी घनसावंगी तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती कृती समितीच्या वतीने बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पारंपरिक वाद्य वाजवित मोर्चा काढला.

Morcha for the implementation of Dhangar community reservation | धनगर समाजाचा आरक्षण अंमलबजावणीसाठी मोर्चा

धनगर समाजाचा आरक्षण अंमलबजावणीसाठी मोर्चा

घनसावंगी : अनुसूचित जाती आरक्षण अंमलबजावणीसाठी घनसावंगी तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती कृती समितीच्या वतीने बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पारंपरिक वाद्य वाजवित घोंगडी खांद्यावर घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
धनगर समाजास अनुसूचित जातीचे आरक्षण दिलेले आहेत. मात्र धनगर आणि धनगड या र आणि ड च्या घोळामुळे अद्यापपर्यंत समाजाला या आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे समाजाची मोठी हानी झाली आहे. आता धनगर समाजाला दिलेल्या या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात धनगर समाज एस.टी आरक्षण कृती समितीचे अ‍ॅड. कैलास जारे, अशोक सोमवारे, अ‍ॅड. विशाल पांढरे, सोपान डोईफोडे, भाऊसाहेब बरेगळ, बालाजी केसकर, माणिक राऊत, अर्जुन डोईफोडे, अ‍ॅड. अशोक तारडे, राम लांडे, अप्पासाहेब वैराळ, सखाराम नाईक, प्रल्हाद नाईक, विठ्ठल मापारी, सुदाम मापारी, बाळासाहेब तार्डे, अशोक लांडे, विलास लांडे, बाबूराव खरात, डॉ.एल. डी. भोजने, अ‍ॅड.लक्ष्मण गायके, प्रमोद तार्डे, डॉ.गंगाधर पांढरे अ‍ॅड.रामेश्वर गायके, अ‍ॅड.वैभव खटके, अ‍ॅड.रामेश्वर गावडे, भगवानराव डोईफोडे, सोपानराव डोईफोडे, दीपक पांढरे, जय खरात, संजय बेवले, संतोष खरात, जीवन वगरे, शिवाजी थेटे, बाबासाहेब आटोळे, बाळू तेसकर यांच्यासह अंबड व घनसावंगी तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अंमलबजावणीच्या मागणीसाठी यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणानून सोडला होता. (वार्ताहर)

Web Title: Morcha for the implementation of Dhangar community reservation