शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

संशोधक गाईडविना

By admin | Updated: August 3, 2016 00:17 IST

औरंगाबाद : पीएच. डी. एन्ट्रन्स टेस्ट (पीईटी) अर्थात ‘पेट’ परीक्षा जाहीर झाली असून, या परीक्षेच्या माध्यमातून फीच्या स्वरूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा

औरंगाबाद : पीएच. डी. एन्ट्रन्स टेस्ट (पीईटी) अर्थात ‘पेट’ परीक्षा जाहीर झाली असून, या परीक्षेच्या माध्यमातून फीच्या स्वरूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सुमारे पन्नास लाख रुपये मिळणार आहेत. दुसरीकडे तीन वर्षांपूर्वी ‘पेट ३’ दिलेल्या ४४५ विद्यार्थ्यांना अद्यापही गाईड मिळाले नसल्याची परिस्थिती आहे. विद्यापीठाने सुमारे तीन वर्षांच्या कालावधीनंतर ‘पेट ४’ जाहीर केली आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी ‘पेट’ देतात. पीएच. डी. करण्यासाठी पात्र व्हाव्या लागणाऱ्या या परीक्षेनंतर अध्यापन क्षेत्रात संधी मिळते. अनेक विद्यार्थी ‘नेट’, ‘सेट’ आदी परीक्षा पास होत नसल्याने ते पीएच. डी. चा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे ‘पेट’देणारे हजारो विद्यार्थी असतात. आॅगस्टनंतर होणाऱ्या यंदाच्या परीक्षेसाठी सुमारे दहा हजार विद्यार्थी पेट देतील असा अंदाज आहे. २०१४ मध्ये झालेल्या पेट परीक्षेसाठी सुमारे नऊ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यंदा विद्यापीठाने खुल्या वर्गासाठी सहाशे रुपये तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी चारशे रुपये फी ठेवली आहे. दहा हजार विद्यार्थी परीक्षेला बसल्यास विद्यापीठाला सुमारे पन्नास लाख रुपये इतकी मोठी रक्कम मिळणार आहे.पेट ३ दिलेल्या ४४५ विद्यार्थ्यांना अद्यापही गाईड मिळालेले नाहीत, अशी माहिती मिळाली. पेट ३ दिलेल्या दिलेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांत विद्यापीठ मार्गदर्शक देऊ शकले नाही. त्यामुळे ‘पेट ४ ’ मध्ये उत्तीर्ण झालेल्या किती विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळतील याबाबत विद्यार्थी साशंक आहेत. ‘पेट ४’ साठी किमान एक हजार विद्यार्थी प्रविष्ट होतील. त्यातील किमान ५०० ते ५५० विद्यार्थी उत्तीर्ण होतील, असे गृहीत धरले तरी या विद्यार्थ्यांना ‘गाईड’ देणे शक्य दिसत नाही. पेट ३ मधील ४४५ विद्यार्थी व पेट ४ मधील पाचशे विद्यार्थी अशा सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना ‘गाईड’ पुरविण्याची जबाबदारी विद्यापीठावर येऊन ठेपणार आहे.