शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

मोदी आज बीडमध्ये

By admin | Updated: October 3, 2014 23:57 IST

बीड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत़ पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच बीडला येत आहेत़ त्यांच्या सभेची जय्यत तयारी केली आहे़

बीड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत़ पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच बीडला येत आहेत़ त्यांच्या सभेची जय्यत तयारी केली आहे़बीड लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या उमेदवार डॉ़ प्रीतम गोपीनाथ मुंडे, तसेच परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे, बीडमधील आ़ विनायक मेटे, गेवराईचे अ‍ॅड़ लक्ष्मण पवार, आष्टीचे भीमराव धोंडे, केजच्या प्रा़ संगीता ठोंबरे तर माजलगावचे आऱ टी़ देशमुख यांच्या प्रचारार्थ येथील धानोरा रोड भागातील भव्य प्रांगणात सभा होईल़ हवाई दलाच्या विशेष सुरक्षेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टरने दुपारी ३़२५ वाजता बीडमध्ये आगमन होणार आहे़ पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार आहे़ तेथून कारने ते सभास्थळी पोहोचतील़ धानोरा रोड परिसरात कडेकोट बंदोबस्तात त्यांची ५१ मिनिटांची सभा पार पडणार आहे़ डी आकाराचे व्यासपीठ बनविले आहे़ व्यासपीठावर मोजक्याच नेत्यांना स्थान राहील़तीन हजार पोलिसांचा फौजफाटाऔरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक अमितेश कुमार गुरूवारपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत़ ते सभेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी स्वत: लक्ष ठेवून आहेत़ शुक्रवारी दुपारी त्यांनी पत्रकारांना सांगितले, सभेला दुपारी ३़२५ वाजता सुरूवात होणार आहे़ खबरदारी म्हणून शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ राखीव पोलीस दल, राज्य सुरक्षा बल, दंगल नियंत्रण पथक तैनात राहणार आहे़ शिवाय वरिष्ठ अधिकारीही ठिकठिकाणी बंदोबस्ताला राहणार आहेत़ तीन हजार पोलिसांची कुमक या कामी नेमली आहे़ सभास्थळी लवकर येणे शक्यतो टाळावे़ उन्हाची तीव्रता पाहता ही खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले़ सभास्थळी मोबाईल, बॅग आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे़वाहतूक व्यवस्थेत बदलअधीक्षक नवीनचंद्र रेड्डी म्हणाले, शनिवारी वाहतूक व्यवस्थेत बदल आहे़ धुळे-सोलापूर महामार्गावरील जड वाहतूक गढीहून माजलगावकडे तर मांजरसुंब्याहून पाटोद्याकडे वळविली आहे़ नगर रोड ते पालवण चौक, अंकुशनगर ते पोलीस मुख्यालय रस्ता बंद राहणार आहे़गेवराईकडून येणाऱ्यांना शिंदेनगर, परळीहून येणाऱ्यांना पालवण रोड तर आष्टीहून येणाऱ्यांना नगर रोडवर पार्किंग व्यवस्था राहील़ (प्रतिनिधी)