मोदींनी महाराष्ट्राची बदनामी थांबवावी

By Admin | Updated: October 7, 2014 00:43 IST2014-10-07T00:38:53+5:302014-10-07T00:43:05+5:30

पैठण : देशाचे जबाबदार प्रधानमंत्री असताना महाराष्ट्रात येऊन मोदी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालून राज्याची बदनामी करीत आहेत.

Modi should stop defamation of Maharashtra | मोदींनी महाराष्ट्राची बदनामी थांबवावी

मोदींनी महाराष्ट्राची बदनामी थांबवावी

पैठण : देशाचे जबाबदार प्रधानमंत्री असताना महाराष्ट्रात येऊन मोदी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालून राज्याची बदनामी करीत आहेत. राज्याची जनता हे खपवून घेणार नाही. कृपा करून महाराष्ट्राची बदनामी करू नका, असा इशारा पैठण येथील विराट जाहीर सभेत खा. सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मोदीशेठ’ असा उल्लेख करीत दिला.
राष्ट्रवादीचे उमेदवार संजय वाघचौरे यांच्या प्रचारार्थ त्यांची येथील शिवाजी चौक परिसरात आज विराट जाहीर सभा झाली. सभेसाठी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, माजी जि.प. अध्यक्ष हरिश्चंद्र लघाने, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष स्वाती चव्हाण, प्रदेश युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष नीलेश राऊत, शिक्षक संघटनेचे संजय जाधव, रवींद्र शिसोदे, अप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे, विजय गोरे, सविता लिंबोरे, वर्षा खेडकर, शेखर पाटील, संजीवनी रोडे, विलास शेळके, हमीद मुर्तझा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मोदींच्या राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टाचारवादी, या विधानाचा सुळे यांनी समाचार घेतला. देशाची सत्ता तुमच्या ताब्यात आहे. पाहिजे ती चौकशी करा आणि नंतर बोला. पेपरमध्ये फोटो येण्यासाठी मोदींचा हा खटाटोप आहे, अशी टीका केली.
महाराष्ट्रातील भाजपाचे नेते बिनकामाचे आहेत का?
स्व. गोपीनाथ मुंडे आज असते तर मला महाराष्ट्रात यावे लागले नसते, असे पंतप्रधानांनी जाहीर सभेतून सांगितले. म्हणजे महाराष्ट्रात असलेले भाजपाचे नेते बिनकामाचे आहेत, असा उल्लेख त्यांनी केला.

Web Title: Modi should stop defamation of Maharashtra