शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा आज फैसला!

By admin | Updated: May 28, 2014 01:14 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही चाचपणी सुरू केली आहे.

सुनील कच्छवे , औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही चाचपणी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी बैठक घेऊन यासंदर्भात प्राथमिक चर्चा केली. उद्या बुधवारी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी पुन्हा एक बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत उमेदवार द्यायचा की नाही यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. त्यामुळे विभागात सध्या निवडणुकीचे ‘तापमान’ वाढत आहे. या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीसह काँग्रेसचाही उमेदवार असणार हे निश्चित. मनसेचाही उमेदवार निवडणुकीच्या फडात उतरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर मनसेच्या उमेदवारांना मोठा पराभव पत्करावा लागला. सर्वच उमेदवारांना आपले डिपॉझिटही गमवावे लागले. त्यामुळे मनसे सावध पावले उचलत आहे. पदवीधरच्या निवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत पदाधिकार्‍यांची एक बैठक घेतली. या बैठकीत पदवीधर मतदारसंघातील मनसेचे बळ, इच्छुक उमेदवार आदी मुद्यांवर प्राथमिक चर्चा झाली; मात्र अंतिम निर्णय होऊ शकला नाही. बुधवारी सकाळी ११.३० वाजता पुन्हा बैठक होणार आहे. बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक पदाधिकार्‍यांनी मात्र खाजगीत बोलताना पदवीधरच्या रिंगणात मनसे उमेदवार देण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले. पक्षाने विधानसभेच्या तयारीवर भर देण्याचे ठरविले असल्याचे पदाधिकारी म्हणाले. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसेने आपला उमेदवार दिला नव्हता. मात्र त्यावेळी मनसेने ऐनवेळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांना पाठिंबा दिला. औरंगाबाद जिल्हा परिषद आणि औरंगाबाद पंचायत समितीमध्ये मनसे काँग्रेससोबतच आहे. उमेदवार देण्यासंदर्भात आज राज ठाकरे यांच्याकडे बैठक झाली. उद्या पुन्हा यासंदर्भात बैठक होणार आहे. त्यात उमेदवार द्यायचा किंवा नाही, हे ठरेल. -सतीश नारकर, संपर्क अध्यक्ष, मनसे