शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा गैरव्यवहार; ४४ लाख वसूल

By admin | Updated: May 8, 2014 00:41 IST

नांदेड : जिल्ह्यात २०१०-११ आणि २०११-१२ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहार प्रकरणात तब्बल ४४ लाख ५० हजार ३९७ रूपयांची वसुली केली आहे़

 नांदेड : जिल्ह्यात २०१०-११ आणि २०११-१२ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहार प्रकरणात जिल्हा परिषदेने आतापर्यंत तब्बल ४४ लाख ५० हजार ३९७ रूपयांची वसुली केली आहे़ याच प्रकरणात दोषी आढळलेल्या उपअंभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकार्‍यांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत़ मनरेगाअंतर्गत उपरोक्त कालावधीत झालेल्या कामांची जिल्हाधिकार्‍यांनी नियुक्त केलेल्या पथकांकडून पाहणी झाल्यानंतर जवळपास २७ गावांमध्ये गैरप्रकार झाल्याची बाब उघडकीस आली़ जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेने यासंदर्भात दोषी असणार्‍या पॅनल तांत्रिक अधिकार्‍यांना सेवामुक्त करण्याची कारवाई केली आहे़ त्यामध्ये लोहा तालुक्यातील मंगनाळे, मुखेड तालुक्यातील जुन्ना, शिरूर येथील गैरप्रकारप्रकरणी लक्ष्मीकांत लुंगारे, कोळनूर, जांभळी, उमरदरी येथील प्रकरणात यु़आऱ मस्कले, बाºहाळी प्रकरणातील डीक़े़ सूर्यवंशी, चोैडी- एस़पी़ रातोळीकर आणि बेरळी खु़ व बु़ प्रकरणातील गैरव्यवहारप्रकरणात पॅनल तांत्रिक अधिकारी आऱएस़ वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे़ त्याचवेळी चौकशीत गैरव्यवहार आढळलेल्या कामांची किंमतही चौकशी पथकाने निश्चित केली़ यातील उमरदरी, होनवडज, कोळनूर आणि चिवळी येथील गैरव्यवहारप्रकरणात ४४ लाख ५० हजार ३९७ रूपये ही रक्कम संबंधित यंत्रणेकडून वसूल करण्यात आली आहे़ ही वसुली काम करणार्‍या यंत्रणांकडून केली आहे़ त्यात ग्रामपंचायतीसह अन्य विभागांचाही समावेश आहे़ याचप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील कामावर झालेल्या गैरव्यवहारप्रकरणातील अधिकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत़ त्यात मुखेड तालुक्यातील जुन्ना, शिरूर, बिल्लाळी येथील गैरव्यवहार प्रकरणात उपअभियंता ए़व्ही़ डावकरे, व्ही़व्ही़ शिंगणवाड, शाखा अभियंता एस़जी़ इंगळे, एम़एऩ भोसले, बाºहाळी - शाखा अभियंता एस़ जी़ इंगळे, जाहूर - शाखा अभियंता पी़पी़ गायकवाड, उमरदरी - शाखा अभियंता एम़एऩ भोसले, बेरळी, राजुरा बु़, आंबुलगा - उपअभियंता ए़व्ही़ डावकरे यांना जबाबदार धरण्यात आले आहे़ तर लोहा तालुक्यातील पार्डी येथील गैरव्यवहार प्रकरणात कनिष्ठ अभियंता ए़ एच. पवार, कंधार तालुक्यातील धानोरा, राऊतखेडा गैरव्यवहार प्रकरणात डी़व्ही़ बस्वदे, नायगाव तालुक्यातील नावंदी, कांडाळा, भोकसदरा प्रकरणात शाखा अभियंता अब्दुल समद, कोठाळा - रत्नपारखी आणि माहूर तालुक्यातील मालवाडा गैरव्यवहारप्रकरणी शाखा अभियंता जी़एफ़ आडे यांना दोषी ठरवले आहे़ याचप्रकरणात ग्रामसेवक पी़ केचाडीकर, एस़टी़ गोरे, एस़एस़ पाटील, एस़व्ही़ पंदलवाड, आऱ एल़ मंदेवाड, एस़ व्ही़ भाडेकर, एस़जी़ शिंदे, एम़एम़ हाळदेवाड, आरक़े़ बारूळकर, पीक़े़ वाडीकर, एस़व्ही़ भाडेकर, एस़एम़ शेखे, एस़ के़ पाणपटे, एमक़े़ माकणे, एस़व्ही़ थोटे, इ़डी़ मुंडे आणि एस़बी़ शिंदे यांना चौकशीदरम्यान अभिलेखे उपलब्ध करून न देणे, चुकीचे माहिती देणे यासंबंधी जबाबदार धरले आहे़ मनरेगांतर्गत कृषीची कामेही झाली आहेत़ त्यात गैरव्यवहार केल्याचा ठपका कृषी अधिकारी - कृषी विस्तार अधिकारी व्ही़व्ही़ चव्हाण, एस़ आऱ पांचाळ आणि ए़व्ही़ आचलवाड यांच्यावर ठपका ठेवला आहे़ मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी बांधकाम विभागाकडे संबंधित अभियंत्यांची तसेच कृषी विभागाकडे कृषी अधिकार्‍यांची नावे सोपविली आहे़ त्यांच्यावरील दोषारोप निश्चित करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत़ (प्रतिनिधी) मजुरांची संख्या जास्त दाखविणे, चुकीच्या नोंदी या योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या कामावर आवश्यकतेपेक्षा जास्त मजुरांची संख्या दाखवणे, रोपवाटिका कामात चुकीचे मोजमाप नोंदविणे, पौळाचे दगड टाकण्याची बाब अंदाजपत्रकात नमूद नसताना चुकीचे मोजमाप दाखविले आदी बाबी चौकशीत पुढे आल्या आहेत़ ठपका ठेवलेल्या अधिकार्‍यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवून कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले आहे़ मनरेगा गैरव्यवहार प्रकरणात विद्यमान जि़प़ अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या मुखेड तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे़