शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेपूर्वी घेतली आमदारांनी मंजुरी़़़

By admin | Updated: July 24, 2014 00:11 IST

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी विकास निधीवर ‘लक्ष्य’ केंद्रित केले आहे़

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी विकास निधीवर ‘लक्ष्य’ केंद्रित केले आहे़ आचारसंहिता १५ आॅगस्टपर्यंत लागण्याची शक्यता ग्राह्य धरून प्रास्तावित कामांची बहुतांश आमदारांनी प्रशासकीय मान्यता घेतली आहे़ ८ कोटी ८५ लाख रूपयांची विविध कामे त्यांनी सुचविली आहेत़ त्यात सिमेंट रस्ते, स्मशानभूमीची संरक्षक भिंत, सार्वजनिक सभागृह, पाणीपुरवठा आदी विकास कामांचा समावेश आहे़ यापूर्वी ३ कोटी १५ लाख रूपयांची विकास कामे झाली असून, आता आचारसंहितेच्या आधी उद्घाटनाचा धुमधडाका उडविण्याच्या तयारीत नेतेगण आहेत़ ही कामे संपतील कधी, याचे कोडे मात्र जनतेला आहे़मतदारसंघाच्या विकास कामांसाठी दरवर्षी २ कोटी रूपयांचा विकास निधी आमदारांना दिला जातो़ हा विकास निधी मतदारसंघातील सिमेंट रस्ते, वाचनालय, ग्रंथालय, सार्वजनिक सभागृह, स्मशानभूमीसाठी शेड व संरक्षक भिंत, चावडी बांधकाम आदी कामांसाठी वापरला जातो़ २००९-१० मध्ये जिल्ह्यातील आमदारांना फक्त २५ लाखांचा निधी मिळाला़ तर २०१०-११ मध्ये १ कोटी, २०११-१२ मध्ये १़५० कोटी मिळाला आहे़ या तिन्ही वर्षांतील सहाही आमदारांचा निधी खर्च झाला आहे़ २०१३-१४ पासून आमदार निधीमध्ये वाढ झाली. तो २ कोटीवर गेला आहे़ त्यामुळे जिल्ह्याला सहा विधानसभा मतदारसंघांसाठी १२ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता़ २०१४-१५ मध्येही १२ कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे़ या निधीतील १० कोटी ९३ लाख रूपयांची विकास कामे आमदारांनी सुचित केली आहेत़ पूर्वी त्यातील २ कोटी ७ लाख रूपयांची विकास कामे पूर्ण झाली आहेत़ प्रास्तावित कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, आचारसंहिता लागली तरी या कामांना अडथळा नाही़ शिवाय, मागील वर्षातील एकाही लोकप्रतिनिधीचा निधी अखर्चित नसल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी एस़एस़रेड्डी यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)१३ कोटींची कामे़़़२०१३-१४ मध्ये शहराचे आ़अमित देशमुख यांनी २ कोटी ९१ लाख ७५ हजार ५१४ रूपये, लातूर ग्रामीणचे आ़वैजनाथ शिंदे यांनी २ कोटी ४५ लाख ७४ हजार, निलंग्याचे आ़डॉ़शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी १ कोटी ४६ लाख २४ हजार, औशाचे आ़बस्वराज पाटील यांनी १ कोटी ७४ लाख ९ हजार ५७१ रूपये, उदगीरचे आ़सुधाकर भालेराव व अहमदपूरचे आ़बाबासाहेब पाटील यांनी २ कोटी रूपयांची कामे पूर्ण केली आहेत़२००९-१० मध्ये लातूर शहराचे आ़अमित देशमुख यांना ३० लाख ६९ हजार ३५४ रूपये, लातूर ग्रामीणचे आ़वैजनाथ शिंदे यांना २५ लाख ८० हजार, निलंग्याचे आ़ डॉ़ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना ३३ लाख ८८ हजार, औशाचे आ़ बस्वराज पाटील यांना ३६ लाख २८ हजार, उदगीरचे आ़ सुधाकर भालेराव यांना २६ लाख ५० हजार, अहमदपूरचे आ़ बाबासाहेब पाटील यांना २६ लाख ५० हजार आमदार निधी मिळाला होता़ तो सर्व निधी खर्च झाला आहे़राज्यमंत्री अमित देशमुख यांनी सर्वाधिक निधी खर्च केला आहे़ २०१३-१४ मध्ये २ कोटी ९१ लाख ७५ हजार ५१४ रूपये विविध विकास कामांवर खर्च झाला आहे़ २ कोटींच्या विकास निधीसह नियोजन समितीकडून त्यांना ९१ लाखांचा निधी विकास कामांना मिळाला आहे़नियोजन समितीच्या बैैठकीत मान्यता़़़जिल्हा विकास आराखड्याला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत १८ जुलै रोजी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे़ या बैैठकीतच आमदार निधीतून होणाऱ्या विकास कामांनाही मंजुरी मिळाली आहे़ जिल्ह्यातील सहाही आमदारांनी एप्रिलपूर्वी मंजूर झालेल्या विकास कामांवरील निधी खर्ची केला आहे़ उर्वरित कामे सुचविली आहेत़ त्याची वर्कआॅर्डरही निघाली आहे़ या कामांना प्रारंभ झाल्यामुळे व काही कामांना मान्यता मिळाल्यामुळे आचारसंहितेचा कसलाही अडथळा राहणार नाही़ शिवाय मागील ४ वर्षांतील एक रुपयाही शिल्लक राहिलेला नाही, असे आमदार बाबासाहेब पाटील, आमदार वैैजनाथ शिंदे, आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले़एखादे काम सुरु झाले आणि ते अर्धवट राहिले तर त्यावरील निधी अखर्चित राहतो़ परंतु, अशी अर्धवट कामे जिल्ह्यात नाहीत, असे नियोजन अधिकारी म्हणाले़