बीड : शहरातील शाहूनगर भागात बुधवारी शिक्षिकेने आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर शिवाजीनगर ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता लक्ष्मण वारे (वय २५, रा. शाहूनगर, बीड) असे मयत शिक्षिकेचे नाव आहे. त्यांना सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जायचा त्यामुळे त्यांनी बुधवारी गळफास घेतला असा आरोप माहेरच्या लोकांनी केला. उमाजी नाथराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन दत्ता लक्ष्मण वारे, सरस्वती वारे, लक्ष्मण वारे व दिगंबर वारे यांच्या विरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}